अजित पवार: अजित पवारांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी – coronavirus ajit pawar angry on officers

0
25
Spread the love

म. टा. प्रतिनिधी, पुणे

प्रशासनावर मजबूत पकड असतानाही आपल्याच जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या रोखण्यात अपयश येत असल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार याचा शुक्रवारी राग उफाळून आला. ‘मुंबईत करोनाची संख्या नियंत्रणात येते; पण पुण्यात का नाही,’ असा सवाल त्यांनी अधिकाऱ्यांना केला. ‘परिस्थिती आटोक्यात आली नाही, तर परिणाम भोगावे लागतील,’ अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांची कानउघडणी केली.

उपमुख्यमंत्री पवार दर शुक्रवारी करोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतात. शुक्रवारची आढावा बैठक वादळी ठरली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही बैठक घेऊन आढावा घेतला आहे. मात्र, तरीही परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याचे चित्र आहे. अजित पवार आठवड्यातील किमान चार दिवस पुण्यात येऊन परिस्थितीचा आढावा घेत आहेत. मात्र, तरीही परिस्थिती आटोक्यात येण्याऐवजी करोनाबाधित रुग्ण वाढत चालले आहेत. बैठकीत चर्चेदरम्यान पवार यांच्या मनातील हे शल्य बाहेर आले. त्यांनी प्रशासकीय अधिकारी आणि पोलिस अधिकारी यांची कानउघडणी केली.

‘रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करा आणि परिस्थिती नियंत्रणात आणा. पुन्हा एकदा हे सांगतो, आता परत सांगणार नाही. परिस्थिती आटोक्यात आली नाही, तर परिणाम भोगावे लागतील,’ अशी तंबी पवार यांनी अधिकाऱ्यांना दिली. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका, पोलिस अधिकाऱ्यांना पवार यांनी धारेवर धरले.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)