अमिताभ बच्चन: करोनावर अमिताभ बच्चन म्हणाले होते ‘मुश्किल बहुत है..’ – amitabh bachchan corona positive viral video on covid-19 coronavirus

0
26
Spread the love

मुंबई- बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन आणि मुलगा अभिषेक बच्चन दोघांनाही करोनाची लागण झाली आहे. पुढील उपचारांसाठी त्यांना तातडीने नानावटी इस्पितळात भरती करण्यात आले आहे. स्वतः बिग बी यांनी या संबंधीचे ट्वीट करून ही माहिती दिली. यासोबतच गेल्या १० दिवसांमध्ये जे अमिताभ यांना भेटले होते त्यांनीही करोना चाचणी करून घ्यावी असं आवाहन बिग बी यांनी ट्वीटमध्ये केलं.

संपूर्ण बच्चन कुटुंबियांची आणि त्यांच्या घरी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची करोना टेस्ट झाली असून जया बच्चन, ऐश्वर्या राय- बच्चन आणि आराध्या बच्चन यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. अमिताभ स्वतः सोशल मीडियावर फार सक्रीय असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी सोशल मीडियावर करोनाशी निगडीत एक व्हिडिओ शेअर केला होता. यात त्यांनी कोविड-१९ नष्ट होण्यासंबंधी लिहिले होते. या व्हिडिओमध्ये अमिताभ बच्चन म्हणाले होते..

अमिताभ बच्चन यांचा ‘जलसा’ बंगला असा झाला पूर्ण सॅनिटाइज

गुजर जाएगा, गुजर जाएगा
मुश्किल बहुत है, मगर वक्त ही तो है
गुजर जाएगा, गुजर जाएगा

जिंदा रहने का ये जो जज्बा है
फिर उभर आएगा
गुजर जाएगा, गुजर जाएगा

माना मौत चेहरा बदलकर आई है,
माना मौत चेहरा बदलकर आई है,

माना रात काली है, भयावह है, गहराई है
लोग दरवाजों पे रास्तों पे रूके बैठे हैं,
लोग दरवाजों पे रास्तों रूके बैठे हैं,

कई घबराये हैं सहमें हैं, छिपे बैठे हैं
मगर यकीन रख, मगर यकीन रख
ये बस लम्हा है दो पल में बिखर जाएगा

जिंदा रहने का ये जो जज्बा है, फिर असर लाएगा
मुश्किल बहुत है, मगर वक्त ही तो है
गुजर जाएगा, गुजर जाएगा।


याआधी अमिताभ बच्चन यांनी लोकांना घरातून बाहेर पडताना मास्क लावूनच बाहेर पडण्याचं आवाहन केलं होतं. यासंबंधीचा एक व्हिडिओही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. विशेष म्हणजे लॉकडाउनच्या काळात बिग बी पूर्णवेळ घरातच होते. त्यांनी एकदाही घराच्या बाहेर पाऊल ठेवलं नाही. असं असतानाही त्यांना करोनाची लागण झाली. घरी राहूनच त्यांनी सरकारी सुचनांचे अनेक रेकॉर्डिंग, एक लघुपट आणि कौन बनेगा करोडपतीच्या १२ व्या सीझनचा एक प्रोमोही शूट केला.

बिग बींनी सांगितलं मंदिरं बंद असण्याचं कारण

अमिताभ बच्चन यांचे सिनेमे

अमिताभ बच्चन यांच्या सिनेमाबद्दल बोलायचे झाले तर नुकताच त्यांचा ‘गुलाबो सिताबो’ सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित झाला. या सिनेमात त्यांच्यासोबत आयुष्मान खुरानाही होता. यासोबतच ‘झुंड’, ‘ब्रह्मास्त्र’ आणि ‘चेहरे’ हे त्यांचे आगामी सिनेमे आहेत.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)