अहमद पटेल: मीच विचारले ‘ईडी’ला प्रश्न : अहमद पटेल – congress leader ahmed patel says he answered the ed’s 128 questions in money-laundering case

0
41
Spread the love

वृत्तसंस्था, नवी दिल्ली :

संदेसारा बंधू बँक घोटाळामनी लाँड्रिंग प्रकरणी ‘अंमलवजावणी संचालनालया’च्या (ईडी) चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी आपणच उलट ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांना प्रश्न विचारल्याचा दावा शुक्रवारी केला. शिवाय संदेसारा समूहाला गुजरात सरकारमधील कोणी लाभ, सन्मान व विशेषाधिकार दिले या प्रश्नाचे उत्तर या अधिकाऱ्यांना देता आले नाही, असेही ते म्हणाले.

संदेसारा ब्रदर्स बँक घोटाळ्यात अडकलेल्या अहमद पटेल यांची गुरुवारी ईडीकडून तब्बल १० तास चौकशी करण्यात आली. चौकशी संपल्यानंतर पटेल मीडियाशी बोलत होते.

मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत पटेल यांची ‘ईडी’कडून ल्युटन्स दिल्लीतील २३, मदर तेरेसा क्रेसेन्ट येथील त्यांच्या निवासस्थानी तीन वेळा चौकशी करण्यात आली. आपण या अधिकाऱ्यांच्या १२८ प्रश्नांची उत्तरे दिली व तीन वेळा घरी आल्याबद्दल त्यांचे आभार मानले, असे पटेल म्हणाले. तपास यंत्रणेच्या सर्व प्रश्नांची आपण उत्तरे दिली, मात्र त्यांना संदेसारा समूहाला गुजरात सरकारमधील कोणी लाभ, सन्मान व विशेषाधिकार दिले, या आपल्या मूलभूत प्रश्नाचे उत्तर त्यांना देता आले नाही, असे त्यांनी सांगितले.

संदेसरा बंधूंशी असलेल्या संबंधांबाबत पटेल यांची चौकशी करण्यात आली. संसेदरा यांनी बँकांकडून घेतलेले १४,५०० कोटींचे कर्ज बुडविल्याचा आरोप आहे. दरम्यान, देशात करोनाचे संकट असताना पटेल यांच्यामागे ‘ईडी’चा ससेमिरा लावणाऱ्या मोदी सरकारची प्राथमिकता यातून दिसून येते, अशी टीका काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी केली आहे.

गुरुवारी सकाळी ११.०० वाजल्याच्या सुमारास केंद्रीय एजन्सीची तीन सदस्यीय टीम काही अन्य अधिकाऱ्यांसोबत दिल्लीच्या लुटियन्स झोन स्थित पटेल यांच्या घरी चौकशीसाठी दाखल झाली होती. सकाळपासून जवळपास १० तास सुरू असलेल्या या चौकशीनंतर ईडीच्या टीम्स रात्री १० वाजता बाहेर निघाल्या. या दरम्यान टीम सदस्यांच्या हातात एक फाईलही होती. तसंच करोना गाईडलाईन्सचं पालन करताना तोंडावर मास्क आणि हॅन्डग्लोव्हजही त्यांनी परिधान केले होते. ईडीच्या टीमनं अहमद पटेल यांचं ‘प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन अॅक्ट’ (PMLA) नुसार म्हणणं रेकॉर्डची नोंद केलीय.

वाचा :कोणीतरी खोटे बोलतंय; राहुल गांधी यांचा मोदीवर निशाणा
वाचा :राहुल गांधी मोदी सरकारचे ‘हे’ पाऊल अडवणार; म्हणाले, ‘लक्षात ठेवा’

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)