आहारात मॅग्नेशिअमची गरज किती मोठ्या प्रमाणात असते ते सविस्तर वाचाच

0
104
Spread the love

पुणे : आपल्या शरीराचा अनेक आजारापासून बचाव करण्यासाठी मग्नेशिअम या मिनरल्सची गरज असते. म्हणूनच शरीराच्या जडणघडणीत मॅग्नेशिअमचं महत्त्व अधिक आहे. ते कोणत्या पदार्थातून मिळू शकतं. हे जाणून घेऊ या. 

आपण नेहमी म्हणतो की, आपलं शरीर तंदुरुस्त ठेवायचं असेल तर आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात पोषणमूल्यांची आवश्यकता असते. त्यातही शरीराला भरपूर प्रमाणात मिनरल्स अर्थात खनिजांची अवाश्यकता असते.या खनिजांपैकी मग्नेशिअम हे महत्त्वाचं खनिज होय. हे आपल्या शरीराला का महत्त्वाचं आहे तसंच ते आपल्याला कोणत्या पदार्थामधून मिळेल हे पाहू या. 

काही पदार्थाचा तुम्ही तुमच्या आहारात नियमित समावेश केल्यास तुम्हाला आपोआप मॅग्नेशिअम मिनरल्स मिळू शकतं. पण मॅग्नेशिअमची पूर्तता करण्यासाठी काही वेगळं करण्याची गरज नाही. 

१  दही
यात कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअमचा उत्तम स्रेत असतो.

२  बदाम
सगळ्यात उत्तम स्रोत म्हणजे बदामच म्हणावं लागेल. पाण्यात भिजवलेले पाच बदाम दररोज खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते. त्याचप्रमाणे चेतासंस्था सुधारते. जेणेकरून चेतासंस्थेचे संबंधित आजरापासून बचाव होतो.

हेही वाचा : जर तुमच्यात ‘व्हिटॅमिन सी’ची कमतरता असल्यास हे उपाय कराच

३  केळं
यात पोटॅशिअमच्या सोबत मॅग्नेशिअमचादेखील भरपूर स्रोत असतो.आपली पाचक शक्ती मजबूत करण्याचं काम केळं करतं. याचबरोबर स्मरणशक्ती वाढवण्याचं कामही ते करतं.

४  हिरव्या भाज्या
हिरव्या भाज्यांमध्ये लोह असतं हे आपल्याला माहितीच आहे.पण त्याचबरोबर मॅग्नेशिअमदेखील भरपूर प्रमाणात मिळतं.शरीराला आवश्यक असणा-या हिमोग्लोबिनमध्ये वाढ करण्याचं काम करतं. त्याचबरोबर स्नायूंनादेखील मजबूत करण्यात मदत करतं.

५ कडधान्य
न्याहारीत मोड आलेले मूग आणि चणे खाल्ले तर शरीराचा मेटाबोलिजम चांगला सुधारतो.

मॅग्नेशियमचे फायदे काय आहेत ?
कॅल्शिअमप्रमाणेच हेहि एक क्षार आहे. शरीरात असलेल्या एन्झाइमबरोबर मिसळून ग्लुकोज करण्याचं मॅग्नेशियम काम करतं.इन्सुलिन करण्याच्या प्रक्रियेतही दुरुस्त करतं. मॅग्नेशिअमचा स्रोत असलेल्या पदार्थाचं सेवन केल्यामुळे टाईप-२ असलेला डायबिटीजचा धोका कमी होतो. त्यामुळेच स्मरणशक्ती मजबूत होते. त्याचप्रमाणे हाय बीपी , हृदयविकार, टेन्शन , माइग्रेन आणि अथ्र्रायटिससारख्या विविध आजारांपासूनही बचाव करण्यास मदत मिळते. त्याचप्रमाणे कॅल्शिअम असल्यास हाडांची मजबुतीही होते. 

हेही वाचा : कोरोनाच्या ‘या’ चाचण्यांचा उल्लेख तुम्ही ऐकल्या असतील, त्या चाचण्याविषयी जाणून ध्याच…

पण त्याचा अतिरेक नकोच 
मॅग्नेशियम हे अतिरिक्त प्रमाणात सेवन केल्यास त्याचा शरीराला फायदा होण्याऐवजी नुकसानच होईल. कारण याच्या अतिरिक्त प्रमाणामुळे लो बीपी ,डायरियासारखे आजार होऊ शकतात. पण नैसर्गिकरित्या तुमच्या शरीरात जेवढे मॅग्नेशियम जाईल तेवढे चांगले. वर सांगितलेल्या पदार्थाचं सेव्हन केल्यास तुम्हाला नैसर्गिकपणे मॅग्नेशिअम मिळतं. मात्र त्याचा अतिरेक अजिबात करू नका. मुळात तुम्हाला कोणते आजार किंवा समस्या असतील तर त्यासाठी  तज्ज्ञ डॉक्टरांचे मत गरजेचे आहे. 

संपादन – सुस्मिता वडतिले  

Source by [author_name]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)