इंधन समायोजन शुल्क: वीज दरवाढीला तूर्तास अटकाव, पण… – mumbai electricity price hike, can increase by 200-300 rupees

0
29
Spread the love

म. टा. प्रतिनिधी, मुंबई :

ग्राहकांना सध्या मिळालेल्या वीज देयकात महावितरणने इंधन समायोजन शुल्क (एफएसी) लावलेले नाही. त्यापोटी १५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. परंतु वीज खरेदीच्या खर्चापेक्षा वीज वितरण खर्च अधिक झाल्यास किंवा वीज विक्रीतून खरेदी खर्च निघू न शकल्यास हे ‘एफएसी’ पुन्हा लागू होईल. तसे झाले, तर ग्राहकांचे वीज देयक २०० ते ३०० रुपयांनी वाढण्याची भीती आहे.

‘१ एप्रिलपासून इंधन समायोजन शुल्क ग्राहकांकडून वसूल करू नये. त्याऐवजी १५०० कोटी रुपयांचा निधी सध्या मिळणाऱ्या महसुलातून वेगळा तयार करावा. वीज खरेदी आणि विक्री (वितरण) यामधील जी तफावत असेल, त्याचा खर्च या १५०० कोटी रुपयांमधून समायोजित केला जावा’, असे निर्देश महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने महावितरणाला दिले आहेत. या निर्देशांमुळे १ एप्रिलपासून ग्राहकांना सध्या तरी ‘एफएसी’पोटी वेगळे शुल्क द्यावे लागत नाही. परंतु हा निधी संपल्यानंतर हे शुल्क पुन्हा ग्राहकांकडून वसूल केले जाण्याची शक्यता आहे.

याबाबत वीज नियामक आयोगाचे माजी सदस्य अशोक पेंडसे यांनी सांगितले की, ‘१५०० कोटी रुपये कधीपर्यंत खर्च होतील, याचे गणित मांडणे कठीण असते. कदाचित वर्षअखेरीस हा खर्च वाढला, तर त्यानंतर इंधन समायोजन शुल्कापोटी ग्राहकांकडून वसुली होईल. पण लॉकडाउन काळात वीज विक्री व महसूल कमी झाला होता, हे नक्की.’

… तर युनिटमागे १ रुपया वाढ

एफएसी न लावल्याने विविध श्रेणीतील वीजदरात १ एप्रिलपासून एक ते पाच टक्के घट झाल्याचा महावितरणचा दावा आहे. परंतु महावितरणच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, फेब्रुवारीपर्यंत महावितरणला वीज खरेदीपोटी आयोगाच्या मंजुरीपेक्षा ४० पैसे प्रति युनिट खर्च अधिक आला आहे. त्यानंतर लॉकडाउन काळात वीज विक्री व महसूलही घटला. एरव्ही दरमहा ५६०० कोटी रु. असलेला वीजबिल महसूल लॉकडाऊन काळात १४०० कोटी रु. पर्यंत घसरल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या स्थितीत वीज खरेदीच्या खर्चाचे समायोजन करताना १५०० कोटी रुपये काही महिनेच टिकतील, अशी स्थिती आहे. तसे झाल्यास पुन्हा एफएसी लागू होऊन, येत्या काही महिन्यात महावितरणाची वीज प्रति युनिट एक रुपयापर्यंत महागण्याची दाट शक्यता आहे.

इंधन समायोजन शुल्क म्हणजे काय?

वीज ग्राहकांकडून आकारल्या जाणाऱ्या विविध शुल्कामध्ये इंधन समायोजन शुल्काचाही (एफएसी) समावेश असतो. संबंधित वीज वितरण कंपनीला वीज खरेदीसाठी आलेला खर्च व त्या मोबदल्यात वीज विक्रीतून मिळणारा महसूल, यावर हे शुल्क अवलंबून असते. वीज खरेदीचा खर्च सातत्याने कमी-अधिक होत असतो. त्यामुळे हे शुल्कदेखील कमी-अधिक केले जाते. परंतु

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)