करोना व्हायरस: आता करोना रुग्णांच्या नातेवाईकांना भेटीची परवानगी – permission to visit relatives of the patient

0
22
Spread the love

कोविड रुग्णालयांत विशिष्ट जागा, आयसीयूमध्ये सीसीटीव्ही बसवणार

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

मुंबईसह राज्यात करोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या कोविड रुग्णालयात संबंधित रुग्णांच्या नातेवाईकांना अशा रुग्णालयात प्रवेश देण्याचा विचार आहे. त्यासाठी अशा रुग्णालयात एक जागा ठेवून तेथे रुग्ण व त्याच्या नातेवाईकास बोलता येईल. तसेच आयसीयूमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचे आदेशही देण्यात आल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

करोना रुग्णांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी त्या रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णवाहिकांबाबत चांगले अनुभव नाहीत. मुंबईसह राज्यातून रुग्णवाहिकांबाबत तक्रारी आहेत. अर्धा किलोमीटरसाठी पाच ते आठ हजार रुपये दर आकारले जातात. त्यामुळे खासगी रुग्णवाहिका ताब्यात घेण्याचा निर्णय राज्य सरकारने अलिकडेच घेतला आहे. खासगी रुग्णवाहिकांनी प्रति किलोमीटर किती दर आकारायचा, त्याचा निर्णय त्या जिल्ह्यातील आरटीओ घेतील. त्यापेक्षा जास्त दर घेतला, तर संबंधित रुग्णवाहिकेचा परवाना रद्द करतानाच गुन्हा दाखल केला जाईल, असा इशाराही टोपे यांनी दिला.

प्लाझ्मा थेरपीत वाढ

करोनाबाधित अथवा संशयित रुग्णांचे संस्थात्मक अलगीकरण अनेक ठिकाणी गांभीर्याने केले जात नाही, त्यामुळे काही ठिकाणी रुग्ण संख्या वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. प्लाझ्मा थेरपीत वाढ करण्याचे ठरविण्यात आले आहे. १० पैकी नऊ रुग्णांना प्लाझ्मा थेरपीचा फायदा होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात प्लाझ्मा केंद्रही सुरू करण्यात येणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)