कसा आहे मोटोरोलाचा स्वस्त 5G स्मार्टफोन Moto G Plus? जाणून घ्या फीचर्स | Moto G 5G Plus affordable 5G phone launched with sex cameras and 5,000 mAh battery get details sas 89

0
20
Spread the love

मोटोरोला कंपनीने बुधवारी आपला Moto G Plus स्मार्टफोन अखेर ग्लोबल मार्केटमध्ये लाँच केला. एकूण सहा कॅमेरे असलेल्या ‘मोटो जी 5जी प्लस’च्या 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज मॉडेलची युरोपमध्ये किंमत 399 युरो (जवळपास 33,700 रुपये) आणि 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत 349 युरो ​​(जवळपास 29,500 रुपये) ठेवण्यात आली आहे. हा फोन केवळ सर्फिंग ब्लू रंगात लाँच करण्यात आला असून कालपासून युरोपमध्ये उपलब्ध झाला आहे. पण, भारतीय मार्केटमध्ये हा फोन कधीपर्यंत उपलब्ध होईल याबाबत अद्याप कंपनीकडून माहिती देण्यात आलेली नाही. लेटेस्ट मिड-रेंज सेगमेंटमध्ये कंपनीने हा फोन लाँच केल्यामुळे हा फोन मोटोरोलाचा आतापर्यंतचा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन ठरला आहे. फोनमध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप आणि स्नॅपड्रॅगन 765 चिपसेट असून 5,000 एमएएच क्षमतेची मोठी बॅटरीही आहे. Moto G Plus च्या पुढील बाजूला ड्युअल सेल्फी होल-पंच डिस्प्ले आणि साइडला एक फिंगरप्रिंट स्कॅनर आहे.

फीचर्स –
अँड्रॉइड 10 वर कार्यरत असलेल्या मोटो जी 5जी प्लसला ड्युअल-सिम कार्डचा (नॅनो + नॅनो) सपोर्ट आहे. यात 6.7 इंचाचा फुल-एचडी + (1080×2520 पिक्सल) एलसीडी डिस्प्ले असून स्नॅपड्रॅगन 765 ऑक्टा-कोर चिपसेट देण्यात आले आहे. हा फोन 6 जीबी रॅम आणि 128 जीबीपर्यंत स्टोरेजसह येतो. याशिवाय माइक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज 1 टीबीपर्यंत वाढवता येणं शक्य आहे. Moto G 5G Plus प्लसमध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप आहे. यातील 48-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा असून 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, 5 मेगापिक्सलचा मॅक्रो लेन्स आणि 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. तर फोनच्या पुढीला बाजूला होल-पंच कट आउटसह 16-मेगापिक्सलचा प्राइमरी सेन्सर आणि एक 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आहे. याशिवाय फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000 एमएएच क्षमतेची बॅटरी फोनमध्ये आहे. फोनला एक साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनरही आहे. तसेच, कनेक्टिव्हिटीसाठी युएसबी टाइप-सी पोर्ट, 5जी एसए/ एमएसए, 3.5 मिलीमीटर ऑडिओ जॅक, ब्लूटूथ 5.1, वाय-फाय 802.11 ए/बी/जी/एन/एसी, एनएफसी यांचा समावेश आहे. 349 युरो म्हणजे जवळपास 29,500 रुपये या फोनची किंमत ठेवण्यात आली असून हा कंपनीचा आतापर्यंतचा सर्वात स्वस्त 5जी स्मार्टफोन आहे. या किंमतीमुळे या फोनची टक्कर वनप्लस स्मार्टफोनसोबत असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 9, 2020 10:38 am

Web Title: moto g 5g plus affordable 5g phone launched with sex cameras and 5000 mah battery get details sas 89Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)