कोल्हापूर करोना व्हायरस: माजी नगरसेवकाच्या आईच्या अंत्यसंस्काराला कार्यकर्त्यांची गर्दी; नंतर करोनाचा रिपोर्ट आला पॉझिटिव्ह – old woman died due to coronavirus; at least 100 attend funeral

0
22
Spread the love

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूरः माजी नगरसेवकाच्या वृध्द आईचे निधन झालं, त्यामुळे सारी गल्ली अंत्यसंस्कारला उपस्थित राहिली. पण दुसऱ्याच दिवशी त्या वृध्देचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आणि साऱ्या गल्लीत खळबळ उडाली. अंत्यसंस्काराला उपस्थित असणाऱ्या शंभरावर लोकांना क्वारंटाइन होण्याची वेळ आली आहे. यामुळे कोल्हापुरातील गंजी माळ परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. (coronavirus in kolhapur)

गंजी माळ झोपडपट्टी परिसरातील राजाराम चौकात एका माजी नगरसेवकाच्या आईचं वयाच्या ७५ व्या वर्षी गुरुवारी निधन झाले. आजारी असल्याने त्यांची स्वॅब टेस्टही घेण्यात आली होती. वृध्दापकाळाने निधन झाले असं समजून सात्वंन करण्यासाठी पै पाहुणे, नातेवाईकांनी गर्दी केली घरी गर्दी केली. गुरुवारी त्यांच्यावर पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळीही मित्रमंडळी आणि नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली.

राज्यात आज २२६ करोनाबळी तर, ७ हजार ८६२ नवे रुग्ण सापडले

शुक्रवारी सायंकाळी त्या वृध्देच्या मृत्यूचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आणि गल्लीत एकच धावपळ उडाली. दिवसभर त्यांच्या घरात अनेकजण भेटायला आले होते. दोन दिवसात दोनशे ते तीनशेपेक्षा अधिक लोकांचा संपर्क आला होता. या सर्वांना शोधण्यासाठी महापालिका प्रशासनाची धावपळ उडाली आहे. गंजीमाळ परिसर सील करण्यात आला. संपर्क आलेल्या सर्वांचे स्वॅब घेण्यात येत असून त्यांना आता १४ दिवस क्वारंटाइन करण्यात येणार आहे. राजकीय व्यक्ती असल्याने विविध पक्षाचे नेते, कार्यकर्ते त्यांच्या सात्वंनासाठी आले होते. या सर्वांनी सायंकाळी ती बातमी कळाली आणि सारेच चक्रावून गेले. असाच प्रकार चार दिवसापूर्वी इचलकरंजी येथील वर्धमान चौकात घडला होता.

मुंबई पोलीस दलात ‘महा’गोंधळ; ‘त्या’ अधिकाऱ्यांच्या पुन्हा बदल्या!

दरम्यान, जिल्ह्यात शुक्रवारी ३४ करोनाबाधित रूग्ण सापडल्याने हा आकडा आता १०८५ पर्यंत पोहोचला आहे. गेल्या आठ दिवसात रोज रूग्णांचा आकडा वाढत असल्याने चिंता वाढली आहे. आतापर्यंत २० जणांचा करोना ने मृत्यू झाला असून ७९६ जण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या विविध रूग्णालयात २४८ लोकांवर उपचार सुरू आहेत.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)