टॉन्सिल्सची लक्षणं आणि कारणे नेमकी कोणती आहेत, त्याविषयी सविस्तर जाणून घ्याच 

0
58
Spread the love

टॉन्सिल या एक प्रकारच्या ग्रंथी असून त्यांची रचना ही घशाच्या मागच्या बाजूला असते. घशाच्या दोन्ही बाजूला या ग्रंथी असतात. टॉन्सिल हा अशा उतींनी बनलेला भाग आहे, ज्या उतींमध्ये 'लिम्फोसाइट्स' नावाचं द्रव्य असतं.

या पेशी शरीराला कोणत्याही प्रकारचा संसर्ग होऊ नये म्हणून काळजी घेतात. असं म्हटलं जातं की, टॉन्सिल्स शरीराची प्रतिकात्मक शक्तीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. तसंच घशाजवळून येणा-या जीवाणू आणि विषाणूंच्या कणांपासून बचाव करण्याचं काम या ग्रंथी करतात.

कारणे पुढीलप्रमाणे 

सगळ्यात महत्त्वाचं कारण सांगायचं झालं तर असं सांगता येईल की, हे टॉन्सिल्स एक तर कोप-यात असतात आणि त्यावर भेगा किंवा लहान लहान फटी असतात. जिथे जीवाणू जाऊन बसतात, तसंच आपण खात असलेल्या काही पदार्थाचे लहान कण, मृत पेशी असं काहीही जाऊन बसण्याची शक्यता अधिक असते. अशा कित्येक गोष्टी त्या फटींमध्ये जातात आणि त्या पदार्थाचा त्या फटींमध्ये ढीग जमा होतो आणि शेवटी त्या सगळ्याचा मिळून घट्ट असा पांढरा थर निर्माण होतो. हा थर कडक झाल्यावर यालाच ‘टॉन्सिल्स स्टोन्स’ किंवा ‘टॉन्सिलोलित्थस’ असं म्हणतात.

साधारणपणे ज्यांचे टॉन्सिल्स खूप वर्षापासून सुजतात, त्यांच्या टॉन्सिल्समध्ये हा प्रकार प्रामुख्याने दिसून येतो. कधीकधी कित्येक लोकांच्या टॉन्सिल्समध्ये हे टॉन्सिलोलित्थस अतिशय लहान स्वरूपात असतात आणि त्याची हळूहळू वाढ होत राहते. मोठा आणि कडक दगड तयार झाला आहे, असं मात्र क्वचितच ऐकायला मिळतं.

लक्षणं पुढीलप्रमाणे 

अगदीच लहानातला लहान म्हणजे सूक्ष्म दगड झाला असेल तरी कोणतीही लक्षात येण्याजोगी लक्षणं आढळत नाहीत. इतकंच नाही तर ते मोठे असतील तरीही हे स्टोन्स एक्स रे किंवा सीटी स्कॅन केल्याशिवाय दिसत नाहीत. असं असलं तरीही काही लक्षणं आढळतात ती पुढीलप्रमाणे –

»  घसादुखी

टॉन्सिल्स स्टोन आणि टॉन्सिलायटिस हे दोन्ही प्रकार एकत्र होतात. तेव्हा तुमचा घसा संसर्गामुळे दुखतोय की स्टोनमुळे दुखतोय हे समजणं अवघड होतं. कारण टॉन्सिल्स स्टोनमुळे तुमचा घसा दुखतो किंवा जिथे तो दगड असेल त्या भागात एक प्रकारची अस्वस्थता जाणवते. कधीकधी टोचल्यासारखं होत राहतं.

»  घसा अतिशय सुजणे

टॉन्सिल्स स्टोनची जागा आणि आकार लक्षात घेता ते सुजतात. त्यामुळे कधीकधी काही पदार्थ किंवा द्रव पदार्थ सेवन करणंही कठीण होतं.

»  कानदुखी

टॉन्सिल्स स्टोन टॉन्सिल्सच्या कोणत्याही  भागात निर्माण होतात. मात्र कानाचा आणि घशाचा सामायिक मार्ग असल्यामुळे कित्येकदा कानदुखी होऊ शकते. मग तो दगड कानाला स्पर्श करत नसला तरीही कान दुखू शकतो.

»  टॉन्सिल्स सुजणे

जमा झालेला कचरा कठीण किंवा कडक होतो आणि त्याचं रूपांतर टॉन्सिल्स स्टोन्समध्ये होतं तेव्हा संसर्ग झाल्यामुळे टॉन्सिल्सना सूज येते. मुळातच टॉन्सिल्स स्टोन झाले की ते टॉन्सिल्स सुजायला कारणीभूत ठरतात.

काळजी कशी घ्यावी ?

या टॉन्सिलोलित्थसचा आकार केवढा आहे आणि त्याची तीव्रता किती आहे यावर याचे उपचार कसे करावेत हे अवलंबून असतं. मात्र पुढील काही पर्यायांचा विचार करता येईल.

»  गुळण्या करा

कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या केल्यास टॉन्सिलिटिसमुळे होणारी अस्वस्थता कमी होते. तसंच टॉन्सिल्स स्टोन्सची तीव्रताही कमी होते.

हे वाचा : क्लॅप  क्लॅप  क्लॅप क्लॅपिंग थेरपी 

»  अँटिबायोटिक्स

टॉन्सिल्स स्टोन्सवर कित्येक प्रकारची औषधं आहेत. काही जणांना या अँटिबायोटिक्सचा उपयोग होतो, मात्र ज्यामुळे टॉन्सिलोलित्थस होतात त्याचं मूळ कारण नष्ट होत नाही. तसंच अँटिबायोटिक्सचे काही साईड इफेक्ट्सही आहेत.

»  ऑपरेशन

टॉन्सिल्स स्टोन्स आकाराने खूप मोठे असतात आणि त्यांची लक्षणंही दिसतात तेव्हा ते ऑपरेशन करून काढण्याशिवाय कोणताही पर्याय नसतो. काही वेळा डॉक्टर अतिशय सोप्या पद्धतीने ते काढण्याचा प्रयत्न करतात. जेणेकरून रुग्णाला गुंगी (अ‍ॅनेस्थेशिया) ही देण्याची गरज भासत नाही.

हे स्टोन्स होऊच नयेत म्हणून काय काळजी घ्यावी ?

ज्यांना टॉन्सिल्सचा अतिशय जुना आजार आहे. त्यांनाच हे टॉन्सिल्स स्टोन होण्याची शक्यता अधिक असते. हे स्टोन्स होऊच  नयेत म्हणून ऑपरेशनशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. या प्रक्रियेला ‘टॉन्सिल एक्टोमी’ असं म्हणतात. टॉन्सिलच्या पेशींचं उच्चाटन केलं जातं. जेणेकरून टॉन्सिलोलित्थस होण्याची शक्यताच धूसर होते.

हे वाचा : अदभूत ! चक्क ११८ वर्षांनंतर  ‘ही’ दुर्मिळ वनस्पती भारतात सापडली

टॉन्सिल स्टोन्स उपटण्याचा यापेक्षा दुसरा मार्ग म्हणजे टॉन्सिलेक्टोमाइज असून तो केवळ अ‍ॅनास्थेशिया देऊनच काढला जातो, मात्र जे पेशंट ही शस्त्रक्रिया करून घेतात त्यांचा काही दिवसांसाठी घसा दुखतो किंवा त्याला सूज येते.

Source by [author_name]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)