डिलिव्हरी पॅकेजचा पत्ता, “मंदिराजवळ आल्यावर कॉल कर…”; फ्लिपकार्टनेही दिला भन्नाट रिप्लाय | Package Delivery Address Says Mandir Ke Samne Phone Lagana Don’t miss Flipkarts reply sas 89

0
19
Spread the love

ई-कॉमर्स वेबसाइटवरुन खरेदी करताना ऑर्डर केलेल्या सामानाऐवजी वेगळीच वस्तू मिळाल्याच्या, चुकीच्या पत्त्यावर सामान डिलिव्हर झाल्याच्या बातम्या अनेकदा येत असतात. पण, सध्या सोशल मीडियावर फ्लिपकार्टच्या डिलिव्हरी बॉयला अनोख्या पद्धतीने पत्ता समजवणाऱ्या एका फोटोने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. व्हायरल होत असलेल्या या फोटोवर आता फ्लिपकार्टनेही प्रतिक्रिया दिली आहे.

Mangesh Panditrao नावाच्या एका ट्विटर युजरने फ्लिपकार्ट डिलिव्हरी पॅकेजचा एक फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये डिलिव्हरी पॅकेजवर ‘Shipping/Customer address’ सेक्शनमध्ये जे लिहिलंय त्यामुळे हा फोटो चर्चेचा विषय ठरतोय. राजस्थानच्या कोटा शहरात डिलिव्हरी होणाऱ्या या पॅकेजवर घराच्या पत्त्याच्या जागी ‘448 चौथ माता मंदिर, मंदिर के सामने आते ही फोन लगा लेना आ जाउंगा’, असं लिहिलेलं आहे.

हा फोटो सध्या व्हायरल होत असून त्यावर फ्लिपकार्टनेही प्रतिक्रिया दिली आहे. ‘घर एक मंदिर है’ या वाक्याला आपण एका वेगळ्या उंचीवर घेऊन जातोय, असं ट्विट फ्लिपकार्टने तो व्हायरल फोटो शेअर करताना केलं आहे.

हा फोटो व्हायरल होत असून नेटकरीही त्यावर मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2020 9:07 am

Web Title: package delivery address says mandir ke samne phone lagana dont miss flipkarts reply sas 89Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)