डोळ्यांचे आरोग्य जपण्यासाठी कसा असावा आहार? जाणून घ्या

0
61
Spread the love

नवी दिल्ली – सध्याच्या स्क्रीन युगामध्ये आपला बराचसा वेळ मोबाइल, लॅपटॉप, कम्प्युटरसमोर जातो. सतत स्क्रीनसमोर बसल्यानं आपल्या डोळ्यांना त्रास होऊ शकतो. यामुळे आपल्या डोळ्यांचे आरोग्य जपण्याची आवश्यकता आहे. यासाठी आहारामध्ये काही पदार्थांचा समावेश केल्यास डोळ्यांचे आरोग्य चांगले राहील. पोषक तत्वांचे प्रमाण जास्त असलेल्या काही पदार्थांची माहिती जाणून घेऊया. यांचा समावेश आहारात केल्यानं शरीर निरोगी राहिलच त्यासोबत नजरही चांगली राहण्यास मदत होईल. 

गाजर
डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आहारामध्ये गाजराचा समावेश करा. व्हिटॅमिन एचे प्रमाण गाजरात जास्त असते. यामुळे डोळ्यांना फायदा होतो. गाजर खाल्ल्यानं रातांधळेपणाचा त्रास होत नाही. तसंच वयानुसार नजरेवर होणारा परिणामही कमी होतो. याशिवाय व्हिटॅमिन ए मिळणाऱ्या पालेभाज्या, फ्लॉवर हेसुद्धा आहारात असायला हवं. 

हे वाचा – पाच असे पदार्थ जे जगभरात मानले जातात हेल्दी, तुमच्याही जेवणात असायलाच हवेत

ओमेगा 3
ओमेगा 3 फॅटी अॅसिड शरीराच्या आरोग्यासह डोळ्यांनाही चांगलं असतं. आक्रोड, सोयाबिन तेल यामधून ओमेगा 3 शरीराला मिळतं. याचा आहारात समावेश करा. 

व्हिटॅमिन सी
व्हिटॅमिन सी हाडांसाठी फायद्याचं असतं. त्याचबरोबर डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठीही त्याचा उपयोग होतो. नारंगी, लिंबू आणि आंबट फळांच्या सेवनाने व्हिटॅमिन सी मिळते. डोळ्यांसाठी याचे सेवन चांगले असल्यानं तुमच्या आहारात व्हिटॅमीन सी मिळणाऱ्या पदर्थांचा समावेश करा. 

हे वाचा – सावधान! तुमच्या आहारातील कॉम्बिनेशन ठरू शकतं घातक

व्हिटॅमिन ई
व्हिटॅमिन ई आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी फायद्याचं असतं. तसंच ते डोळ्यांच्या आरोग्यासाठीही व्हिटॅमिन ई चांगलं असतं. हे एक अँटिऑक्सिडंट आहे. बदाम, पालक यातून व्हिटॅमिन ई मिळतं. 

आहारात लोहयुक्त पदार्थ
नजर चांगली रहावी यासाठी आहारात झिंक असायला हवं. अनेक अभ्यासामध्ये असं समोर आलं आहे की, लोहाचं प्रमाण शरीरात कमी झाल्यानं रातांधळेपणाचा त्रास होऊ शकतो. यासाठी तुमच्या डाएटमध्ये सीप, मांस, हरभऱे, बदाम इत्यादी असायला हवेत. 

Source by [author_name]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)