तुमच्या लॅपटॉपची बॅटरी लाइफ दोन तासांनी वाढणार, Chrome च्या नव्या अपडेटमध्ये होणार फायदा | Google Chrome’s next update could help increase battery life of your laptop by up two hours sas 89

0
25
Spread the love

इंटरनेट ब्राउजिंगसाठी गुगलच्या क्रोम ब्राउजरचा वापर करणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. गुगल सध्या क्रोमच्या नव्या अपडेटवर काम करत आहे. नवीन अपडेट तुमच्या लॅपटॉपच्या बॅटरीसाठी महत्त्वाचं ठरेल, कारण या नव्या अपडेटमुळे लॅपटॉपची बॅटरी लाइफ वाढेल असं सांगितलं जात आहे.

‘विंडोज क्लब’च्या रिपोर्टनुसार, क्रोमच्या नवीन अपडेटमध्ये एका खास यंत्रणेद्वारे वेबपेजच्या बॅकग्राउंडमधील ‘जावास्क्रिप्ट टाइमर’वर निर्बंध येतील. याचा थेट फायदा लॅपटॉप किंवा डिव्हाइसच्या बॅटरीला होईल आणि बॅटरी लाइफ वाढेल. यासाठी गुगलने एक टेस्ट घेतली. त्यामध्ये ३६ ‘टॅब’ बॅकग्राउंडला ओपन ठेवण्यात आल्या. त्यात ‘जावा स्क्रिप्टटाइमर’ एक मिनिटावर सेट करण्यात आला. त्यानंतर कॉम्प्युटरला दोन तासांची अतिरिक्त बॅटरी लाइफ मिळाल्याचं समोर आलं आहे.

याशिवाय बॅटरी लाइफसाठी गुगलने अन्य काही चाचण्याही घेतल्या आहेत. क्रोम, विंडोज, मॅक आणि अँड्रॉइडसाठी हे नवीन फीचर उपलब्ध होईल. हे फीचर क्रोमच्या नव्या अपडेटमध्ये उपलब्ध होईल अशी माहिती आहे. पण नवीन अपडेट कधीपर्यंत रोलआउट होईल याबाबत अद्याप कंपनीकडून माहिती देण्यात आलेली नाही. पण, लवकरच हे फीचर उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2020 2:55 pm

Web Title: google chromes next update could help increase battery life of your laptop by up two hours sas 89Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)