तुम्ही सुपरवुमन आहात पण तुमच्या आरोग्याचं काय…? काही टिप्स तुमच्यासाठी…

0
67
Spread the love

घरातील स्त्रीचे आरोग्य निरामय असेल, तर सगळ्या घराचे आरोग्य म्हणजे घरातील लोकांचे आरोग्य निरोगी असणार आहे. आपली रोग लक्षणे कुरवाळत बसू नका. कुठल्याही रोग लक्षणांची थोडी जरी शंका आली तरी डॉक्‍टरांना भेटून शंकांचे निरसन करा.

आजच्या स्त्रीचं थोड्याफार प्रमाणात आर्थिक सक्षमीकरण झालं असलं तरी तिच्या आरोग्याचं काय? धावपळीच्या युगात स्त्रीला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ कुठे आहे. खरं तर वेळ वगैरे या गोष्टी गौण आहेत. आजची स्त्री घरातील सगळं बघते, आर्थिक नियोजनही करून स्वतःसाठी ती नक्कीच वेळ देऊ शकते. फक्त यासाठी स्त्रीची इच्छाशक्ती हवी.. मला माझं आरोग्य सांभाळायचं, व्यवस्थित ठेवायचंय.. ते ती नक्कीच करू शकते.
अनेक सर्वसामान्य महिला रोज आपल्या आरोग्याच्या समस्यांशी लढत असतात. ब्रेस्ट कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर किंवा विकारही अनेकांमध्ये गंभीर स्वरूप धारण करीत आहेत. रोगाची लक्षणे कुरवाळत बसायचं आणि रोग वाढला, की डॉक्‍टरांकडे धावपळ करायची. इतरांनी दुर्लक्ष केलं, तरी वेळेवर उपचार घेणं हे तिच्याच हातात असतं. वेळीच उपचार केले, तर वेळ व पैसा यांचा अपव्यय टळू शकतो. अजूनही वेळ गेलेली नाही. स्त्रियांनो, आपल्या आरोग्याचे रक्षण करा. कुठल्याही रोगाची थोडी जरी शंका आली तरी डॉक्‍टरांना भेटून शंकांचे निरसन करा. गरज लागली तर रक्तचाचण्या, क्ष-किरण चाचणी वगैरे तपासण्या जरूर करा.

स्त्रीला 'मेनोपॉज' आला किंवा मासिक पाळी बंद झाली, तर हार्मोन्सचे प्रमाण कमी होते आणि त्यामुळे स्त्रियांमध्ये हाडे ठिसूळ होणे, सांधेदुखीचे प्रमाण वाढते. हाडांच्या मजबुतीला त्यामुळे प्राधान्य मिळत नाही. या उलट शेतात काम करणारे, मोलकरीण, मजूर, खेळाडू यांची हालचाल खूप अधिक होते. कारण त्यांच्या व्यायामानुसार आधारानुसार हाडे अधिक मजबूत होतात. हार्मोन्सच्या बरोबर कॅल्शियम व 'ड' जीवनसत्त्व हेही महत्त्वाचे आहे. घशातील थायरॉईड ग्रंथींमधून पाझरणाऱ्या पॅराथॉरमॉनसारखे हार्मोन्स रक्तातील पातळी नियंत्रित करीत असतात. शिवाय, एका विशिष्ट वयानंतर शरीराची मर्यादेपेक्षा जास्त व्यायाम किंवा हालचाल धोकादायक ठरू शकते. यासाठी डॉक्‍टरांकडून योग्य मार्गदर्शन घ्यावे. शरीर ही आपल्याला मिळालेली देणगी आहे, तिची काळजी घ्या, आदर करा. आहाराचे नियम पाळा आणि आनंदी जीवन जगा.

काय करायला हवं..?

  • चाळिशीनंतर खाणं कमी करा.
  • दर सहा महिन्यांनी 'फुल बॉडी प्रोफाईल'ची चाचणी करा.
  • कोलेस्टेरॉल, हिमोग्लोबीन, रक्तातील साखर वगैरेचे नियमित 'चेकअप' करा.
  • चाचणीत काही “ऍबनॉर्मल' रिपोर्ट असेल तर त्यानुसार वेळीच योग्य औषधोपचार करा.
  • चालणे, पोहण्यासारखा सर्वांग सुंदर व्यायाम करा.
  • उत्साही राहा, मन तंदुरुस्त ठेवा, मानसिक दौर्बल्याला थारा देऊ नका.
  • चांगले वाचन, छंद, बागकाम वगैरे छंद जोपासा.
  • चांगले संगीत ऐका, आरोग्य साक्षर व्हा.

 

 

Source by [author_name]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)