दयाशंकर अग्निहोत्री: पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या दुबेच्या साथीदाराला मोठ्या धुमश्चक्रीनंतर अटक – one goon dayashankar agnihotri arrested in kanpur who was with vikas dubey while attack on police

0
20
Spread the love

कानपूर : कानपूरच्या बिकरू गावात झालेल्या पोलिसांवरील हल्ल्यातील एका आरोपीला अटक करण्यात आलीय. मुख्य आरोपी विकास दुबे याचा हा साथीदार आहे. कानपूर पोलिसांनी मोठ्या चकमकीनंतर दयाशंकर अग्निहोत्री या आरोपीला अटक केलीय. या चकमकीत आरोपी अग्निहोत्री जखमीही झालाय.

पोलिसांवर गोळीबार करण्यात आला तेव्हा दयाशंकर अग्निहोत्री विनय दुबेसोबतच होता. अग्निहोत्रीवरही २५ हजार रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. अग्निहोत्री याला कानपूरच्या कल्याणूर पोलीस स्टेशन परिसरात पहाटे पावणे पाचच्या सुमारास अटक करण्यात आली. अटक करण्यासाठी पोलिसांना त्याच्यावर गोळ्याही झाडाव्या लागल्या.

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या एका टीमनं दयाशंकर याला एका भागात घेरल्यानंतर आत्मसमर्पण करण्याचं आवाहन केलं होतं. या दरम्यान त्यानं पोलिसांवर गावठी कट्ट्यातून फायरिंग केलं. पोलिसांवर पुन्हा हल्ला करून पळून जाण्याच्या प्रयत्नात तो होता. त्यानंतर पोलिसांनीही प्रत्यूत्तरादाखल त्याच्यावर गोळीबार केला.

वाचा :गँगस्टर विकास दुबेचे घर केले जमीनदोस्त, नेपाळमध्ये पळाल्याचा संशय
वाचा :विकास दुबेवर ५० हजारांचं बक्षीस जाहीर, आई म्हणाली ‘ठार करा’

या दरम्यान दयाशंकर जखमी झाला. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केलीय. त्याच्याकडून एक गावठी कट्टा आणि इतर सामान जप्त करण्यात आलंय.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, दयाशंकर अग्निहोत्री याला सध्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. याशिवाय त्याच्या साथीदारांचा शोध लावण्यासाठी पोलीस त्याच्या चौकशीचाही प्रयत्न करत आहेत.

पोलिसांवरच्या हल्ल्यातील मुख्य आरोपी विकास दुबे हा अद्यापही फरार आहे. दोन दिवसांपूर्वी, गुंडांच्या या हल्ल्यात एका पोलीस उपाध्यक्षासहीत आठ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला तर इतर सात जण गंभीर जखमी झाले होते. पोलिसांच्या २० हून अधिक टीम त्याच्या शोधात आहेत. विकास दुबे याची माहिती देणाऱ्याला ५० हजारांचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय. दुबेची माहिती देण्यासाठी नागरिकांनी ९४५४४००२११ या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय.

वाचा : कानपूरमध्ये पोलिसांवर मोठा हल्ला; चकमकीत ८ पोलिस शहीद
वाचा : कानपूर एन्काउंटर: कोण आहे विकास दुबे? जाणून घ्या

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)