पाणी साचण्याची समस्या: ‘कोस्टल’ खबरदारी, नागरिकांनो पाणी साचलं तर इथे करा तक्रार – coastal road project, citizens can register complaint here if water stagnant

0
41
Spread the love

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोस्टल रोड प्रकल्पात आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जात आहे. मात्र अपवादात्मक परिस्थितीत या प्रकल्पातील कामांमुळे पाणी साचण्याची समस्या निर्माण झाल्यास तात्काळ उपाययोजना करण्यासाठी प्रियदर्शिनी उद्यान, अमरसन्स उद्यान व वरळी डेअरी या तीन ठिकाणी नियंत्रण कक्ष उभारले आहेत, अशी माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.

दक्षिण मुंबईतील शामलदास गांधी मार्ग, गिरगाव ते राजीव गांधी सागरी सेतू, वरळी यांना जोडणाऱ्या ९.९८ किमीच्या कोस्टल रोडचे काम वेगाने सुरू आहे. बांधकाम सुरू असलेल्या भागात पाणी साचण्याची समस्या उद्भवल्यास नागरिकांनी संबंधित नियंत्रण कक्षाकडे किंवा पालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या १९१६ या दूरध्वनीवर तक्रार नोंदवावी, असे आवाहन कोस्टल रोडचे प्रभारी प्रमुख अभियंता विजय निघोट यांनी केले आहे.

येथे नोंदवा तक्रार

– अमरसन्स उद्यान नियंत्रण कक्ष

आपत्कालीन क्रमांक ०२२-२३६१०२२१

राकेश सिंग सिसोदीया, अधिकारी ९१६७०६११०६ प्रकल्प व्यवस्थापकीय सल्‍लागार प्रतिनिधी देवेंद्र प्रसाद ९९६७०१४३६२

निवासी अभियंता राजेश जाधव ९७०२४६७५७५

– वरळी डेअरी नियंत्रण कक्ष

आपत्कालीन क्रमांक ०२२-२४९००३५९

अविक पांजा, अधिकारी ८६५७५००९००

आजाद सिंग, अधिकारी ९८१९०२६५९५

प्रकल्प व्यवस्थापक स्‍वर्णेंदु सामंता ७०१६७६५०७६

शशिकांत एस. व्‍ही. ९१३६९९३७०३

– प्रियदर्शिनी उद्यान एमएसआरडी नियंत्रण कक्ष

आपत्कालीन क्रमांक ०२२-२३६२९४१०

संदीप सिंग, अधिकारी ९९५८८९९५०१

उत्पल दत्ता, अधिकारी ९९५८७९३०१२

प्रकल्प व्यवस्थापक किम जॅन्‍ग यॉन्ग ७०४५९०१३६६

निवासी अभियंता विजय जंगम ७०८५४९३६३८

नालेसफाई ऐरणीवर

नालेसफाईच्या कामात प्रचंड घोटाळा झाल्याचा दावा करत पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी त्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सोमवारी तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे. नाल्यांमध्ये अजूनही पाच ते सहा फूट गाळ असून त्यामुळेच मुंबईत पाणी तुंबले आहे. नालेसफाईच्या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असून कंत्राटदारांवर कारवाई झाली पाहिजे, असे राजा यांनी म्हटले आहे. पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी मुंबईत नालेसफाई ११३ टक्के झाल्याचा दावा केला होता. त्याचवेळी मी आयुक्तांना पत्र लिहून केवळ २५ ते ३० टक्के नालेसफाई झाल्याचे स्पष्ट केले होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या आकडेवारीवर विसंबून राहू नका, असा सल्लाही आयुक्तांना दिला होता. २९ आणि ३० जून रोजी मी स्वत: नालेसफाईची पाहणी केली असता नाल्यांमध्ये चार फूट गाळ असल्याचे दिसून आले, असे राजा म्हणाले.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)