पावसाळ्यातील आजारावर 'हे' उपचार ठरतात उपयुक्त…

0
108
Spread the love

पावसाळ्यात होमिओपॅथी औषधांचा अल्पकालीन व दीर्घकालीन, असा दोन्ही प्रकारे चांगला उपयोग होतो. शिवाय त्याचा शरीरावर कोणताही दुष्परिणाम होत नाही. होमिओपॅथी औषधे ही मानसिकतेवर सकारात्मक परिणाम करतात. त्यामुळे मनावरचा ताण कमी होऊन प्रतिकारशक्ती चांगल्या प्रकारे वाढते. पावसाळ्यातील आजारांवर होमिओपॅथी उपचार उपयुक्त ठरतात.

पावसाळा आला की आनंद होतो; पण चिंतातूर पालकांच्या छातीमध्ये धस्स होते. पावसाळ्यात वातावरणात सतत बदल होत असतात. पावसाळ्यात दमट हवामान असते. वातावरणामध्ये फरक पडलेला असतो. घराच्या भिंतींवर व कुंपणावरती शेवाळ साचलेले असते. हवामान ढगाळ असते. या सगळ्यांमधून सर्दी, खोकल्याच्या विषाणूंच्या संख्येत वाढ होते. त्यामुळे सर्दी, ताप, खोकला, अशी लक्षणे दिसून येतात. काही वेळा सर्दी, खोकला विषाणूजन्य नसून जिवाणूंमुळे होतात. अशा वेळेस कान फुटणे, छातीत कफ होऊन न्यूमोनिया होणे, अशा समस्या उद्भवतात.

या दिवसांमध्ये डासांच्या वाढत्या प्रमाणामुळे डेंगी, मलेरिया, चिकनगुनियासारख्या आजारांमध्ये वाढ होते. ओल्या कपड्यांमुळे त्वचेच्या तक्रारी सुरू होतात. फंगल इन्फेक्‍शन होते. वारंवार पाण्यात काम करणाऱ्या व्यक्तींना चिखल्या होतात. दूषित पाण्यामुळे टायफॉईड, कावीळ यांसारखे आजार उद्‌भवतात.
पावसाळ्यात लहान मुलांची पोटे नाजूक झालेली असतात. खाण्यात थोडाफार जरी बदल झाला, तरी पोट बिघडते. मग उलट्या, जुलाब त्यातून होणारा जलक्षय सुरू होतो. अस्थमा, न्यूमोनिया यांसारख्या दुर्धर आजारांमध्ये वाढ होते.

होमिओपॅथी औषधांमुळे आपली रोग प्रतिकारकशक्ती वाढविण्याचे महत्त्वाचे काम होमिओपॅथी औषधे करीत असतात. होमिओपॅथी औषधाने शारीरिक, तसेच मानसिक कमतरता निघून जाते.

होमिओपॅथीमध्ये त्या त्या बाबींचा सूक्ष्मरीत्या अभ्यास केला जातो व त्यामुळे त्या रुग्णाची प्रतिकारक्षमता वाढवते व कितीतरी पावसाळे तो झेलू शकतो. गरज पडल्यास वेळोवेळी डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार तपासण्या कराव्यात. घाबरून न जाता शांतपणे, व्यवस्थित उपचार घ्यावेत. सर्व प्रकारच्या विषाणूजन्य आजारांत विश्रांती व संयम बाळगणे आवश्‍यक आहे.

होमिओपॅथी औषधांचा अल्पकालीन व दीर्घकालीन दोन्ही प्रकारे चांगला उपयोग होतो. शिवाय शरीरावर कोणताही दुष्परिणाम होत नाही. होमिओपॅथी औषधे ही मानसिकतेवर सकारात्मक परिणाम करतात, त्यामुळे मनावरचा ताण कमी होऊन प्रतिकारशक्ती चांगल्या प्रकारे वाढते.

उपचाराचे महत्त्व…

प्रत्येक व्यक्तीची प्रतिकारशक्ती ही त्या व्यक्तीच्या दैनंदिन जीवनशैली, करत असलेला व्यायाम, घेत असलेला आहार, मानसिक ताणतणाव व इतर कोणती व्याधी आहे का, यावर अवलंबून असते. संशोधनाअंती असे दिसून आले आहे, की अत्यंत दुर्धर व गंभीर अशा आजारांनी ग्रासलेले रुग्ण, जसे की कर्करोग असलेले रुग्ण, किडनी खराब झालेले रुग्ण, लिव्हरचे रुग्ण, मधुमेही व्यक्ती व हृदयविकार असणारे रुग्ण. वरील सर्व रुग्णांमध्ये ज्या व्यक्ती नियमित होमिओपॅथीचे उपचार घेतात, अशा सर्व रुग्णांना, कोणत्याही प्रकारचा विषाणूजन्य आजार झालेला नाही. यावरून हेच सिद्ध होते, की कोणत्याही विषाणूजन्य, जिवाणूजन्य आजाराचा आपल्याला सामना करायचा असेल, तर होमिओपॅथी हे शास्त्रच सर्वोत्तम आहे.

फुफ्फुसाचा कर्करोग ILD, COPD, MDR-TB या सर्वांवर होमिओपथी उपचाराचे महत्त्व वादातीत आहे. त्याचप्रमाणे लहान मुलांमधील किंवा मोठ्या व्यक्तींमधील दमा, वारंवार टॉन्सिलला येणारी सूज, जुनाट व ऍलर्जिक सर्दी, सायनसचा त्रास, नाकातील हाड वाढणे या सर्वांमध्येही होमिओपॅथी उपचाराचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

पावसाळ्यात पाळा ही पथ्ये

  • वरील सर्व आजार टाळण्यासाठी प्रत्येकाने आपली प्रतिकारशक्ती वाढविणे गरजेचे आहे.
  • पावसाळ्यात गढूळ पाणी येते. ते गाळून, उकळून प्यावे.
  • शाळेच्या मुलांनी घरातून पाण्याची बाटली न्यावी. बाहेरचे पाणी शक्‍यतो टाळावे.
  • मांसाहार, मसालेदार पदार्थ, वातजन्य पदार्थ टाळावेत.
  • समाजाचे आरोग्य शिक्षण आवश्‍यक.

Source by [author_name]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)