पावसाळ्यातील आजार: आरोग्यमंत्र : पावसाळ्यात टाळा श्वसनविकार – health mantra

0
27
Spread the love

– डॉ. प्रशांत छाजेड, श्वसनविकातज्ज्ञ

मुंबईकर आता ‘कोविड-१९‘विरोधातील खबरदारीचे उपाय घेण्यासोबत पावसाळ्याशी संबंधित इतर संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्याचेही मोठे आव्हान आहे. आपल्यापैकी अनेकजण सध्या घरामध्येच आहेत, पण आपण या ऋतूदरम्यान आपले आरोग्य सक्षम ठेवण्यासाठी खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे. इनडोअर एअर क्वॉलिटी (आयएक्यू) म्हणजे घरातील आणि बंदिस्त जागांमधील हवेचा दर्जा चांगला ठेवणे. घरामधील प्रदूषण पसरवण्यासाठी कारणीभूत असलेले घटक जाणून घेणे आणि त्यावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. यामुळे पावसाळ्यादरम्यान अनेक आरोग्यविषयक आजारांवर प्रतिबंध ठेवण्या‍सोबत त्यांचा धोका कमी करण्यामध्ये मदत होईल.

यावर लक्ष ठेवा…

– आर्द्रतेमध्ये वाढ झाल्याने बुरशीसारखा किंवा दमट वास येऊ शकतो. बुरशीमध्ये वाढ झाल्याने फर्निचर ओलसर होते.

– पावसाळ्यात घरामध्ये रोगजंतू व कीटकदेखील वाढू शकतात.

– आसपासच्या वातावरणात निर्माण झालेल्या थंडाव्यामुळे पृष्ठभाग आकुंचन पावतात आणि ओलसर होतात. पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या ओलसरपणामुळे फर्निचर व साहित्यांवर रासायनिक किंवा बायोलॉजिकल क्रिया होऊ शकते. यामुळे घरामध्ये वायूप्रदूषण होऊ शकते. म्हणूनच ओलसरपणामुळे दमा आणि खोकला व घसा खवखवणे सारखे श्वसनविषयक आजार होण्याचा धोका वाढतो.

ओलसरपणा वाढल्यामुळे घरातील सदस्यांच्या आरोग्यावर होणारे परिणाम दिसून येऊ शकतात.

घरामध्ये असणारे हे घटक दम्यासारख्या आजारांची लक्षणांच्या निर्मितीसाठी कारणीभूत ठरतात. ही स्थिती वाढत गेली तर चिंताजनक होऊ शकते. आरोग्यदायी व तंदुरुस्त राहण्यासाठी पावसाळ्यादरम्यान घरातील प्रदूषकांशी होणारा संपर्क कमी किंवा प्रतिबंध करण्यासाठी खालील सूचनांचे पालन करा :

– घरातील हवा खेळती ठेवा.

– दिवसा पुरेशा प्रमाणात सूर्यप्रकाश असेल तर खिडक्या खुल्या ठेवा. त्यामुळे घरातील हवा शुद्ध होते.

– सूक्ष्म जीवांची वाढ होण्यास प्रतिबंध करण्यासाठी घरातील पाणीगळती व ओलसरपणाची तपासणी करा.

– एअर कंडिशनिंग फिल्टर्सची स्वच्छता नियमितपणे करा.

– दम्याने पीडित रुग्णांनी पावसाळ्यादरम्यान विशेष काळजी घेण्याची गरज आहे. लाकडी फर्निचर व शूज, लेदर बॅग्ज अशा इतर वस्तूंवर बुरशी वाढणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. अशा वस्तू सुक्या जागेमध्ये ठेवा आणि ती जागा नेहमी स्वच्छ ठेवा. अन्यथा दमा असलेल्यांना अधिक त्रास होऊ शकतो.

– घरातील कारपेट, पडदे व इतर कपडे स्वच्छ व सुके असल्याची खात्री करा.

– मुले किंवा वृद्धांसमोर धूम्रपान करणे टाळा.

– प्रत्येकवेळी स्वच्छ व सुके कपडे परिधान करा. बंदिस्त खोलीमध्ये ओले कपडे सुकायला ठेवणे टाळा.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)