बलात्काराच्या आरोपीकडून ३५ लाखाची लाच, महिला PSI ला अटक | Gujarat Woman PSI held for demanding Rs 35 lakh bribe from rape accused sas 89

0
19
Spread the love

गुजरातच्या अहमदाबादमध्ये बलात्काराच्या आरोपीकडून ३५ लाख रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरुन एका महिला पोलिस उपनिरीक्षकाला (पीएसआय) अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या पीएसआय महिलेला शनिवारी सत्र न्यायालयात हजर केलं असता तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवण्यात आलं आहे.

श्वेता जडेजा असं अटक केलेल्या आरोपी महिला पीएसआयचं नाव असून त्या अहमदाबाद पश्चिमच्या महिला पोलिस स्थानकात कार्यरत आहेत. बलात्काराच्या आरोपीकडून ३५ लाख रुपये घेतल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एफआयआरनुसार, अहमदाबादच्या एका खासगी कंपनीतील दोन महिला कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकाविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. या घटनेच्या तपासादरम्यान श्वेता जडेजा यांनी आरोपी व्यवस्थापकीय संचालक केनल शाह याच्याकडे कठोर कारवाई न करण्यासाठी ३५ लाख रुपयांची लाच मागितली.

श्वेता जडेजाने केनल शाहचा भाऊ भावेशकडे ३५ लाख रुपयांची लाच मागितली. दोघांमध्ये २० लाख रुपये देण्याचं ठरलं. नंतर श्वेता यांनी २० लाख रुपये एका तिसऱ्या व्यक्तीकडून स्वीकारले, पण त्यानंतर त्यांनी अजून १५ लाख रुपयांची मागणी केली. अजून १५ लाख रुपयांची मागणी केल्यानंतर २७ जून रोजी केनल शाह यांनी क्राइम ब्रांचमध्ये संपर्क साधून जडेजा यांची तक्रार केली होती. शनिवारी पोलिसांनी जडेजा यांना कोर्टासमोर हजर करत सात दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली. पण कोर्टाने त्यांना तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2020 12:49 pm

Web Title: gujarat woman psi held for demanding rs 35 lakh bribe from rape accused sas 89


Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)