भन्नाट संशोधन, आता कोरोनाला मारा आणि राहा फ्रेश.. फ्रेश.. ! कसं ? वाचा…

0
65
Spread the love

मुंबई : जसा कोरोना आला तेंव्हापासून सतत आपल्या कानावर दोन गोष्टींची नावं पडतायत. त्यातील एक म्हणजे मास्क आणि दुसरं म्हणजे सॅनिटायझर. पण आता आम्ही तुम्हाला सांगितलं की आता हेच सॅनिटायझर तुम्हाला एक्दम फ्रेश ठेवेल, तर तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही. मात्र हो, हे खरं आहे. कारण आता तुमचं सॅनिटायझर तुम्हाला कोरोनापासून तर वाचवेलच सोबत तुम्हाला ताजतवानं देखील ठेवणार आहे. आयआयटी कानपूरचा माजी विद्यार्थी आणि आयआयटी गुवाहाटीच्या प्राध्यापकांनी मिळून  डिओडोरंट कम सॅनिटायझर स्प्रे तयार केलाय. त्यांनी कानपूरमधील फ्रँग्रॅन्स अँड फ्लेव्हर डेव्हलमेंट सेंटरमध्ये अनोख्या डिओवर काम केलं आहे.

BIG NEWS – मुख्यमंत्री म्हणाले होते, “नाहीतर पुन्हा सगळं बंद करावं लागेल”; तसंच झालंय 'सहा' मोठी शहरं टोटल बंद
 

कसा बनलाय हा डिओडोरंट कम सॅनिटायझर  स्प्रे :- 

  •  80 टक्के इथेल अल्कोहोल
  •  10 टक्के ग्रीन ऑईल
  •  10 टक्के मॉईश्चराइझर न्यूट्रोजेना ऑईल 
  •  यामध्ये सुगंधासाठी विशेष सुगंधी तेलाचा वापर करण्यात आला आहे.

याबद्दल सांगताना IIT कानपूरचे माजी विद्यार्थी आंशिक गंगवार म्हणालेत, या डिओडोरंट कम 'स्प्रे'मध्ये  80 टक्के इथेल अल्कोहोल असल्याने हे एक उत्तम सॅनिटायझर म्हणून काम करेल असं म्हटलंय. सोबतच यातील इतर तत्त्वांमुळे तुम्हाला हा डिओडोरंट कम सॅनिटायझर स्प्रे ७ ते ८ तास फ्रेश आणि दुर्गंधीमुक्त ठेवू शकतो. हा स्प्रे कपडे आणि शरीर दोघांवर मारू शकतात असं देखील सांगण्यात येतंय.

BIG NEWS – कोरोनाने तोडल्या जाती-धर्माच्या भिंती; मरीनलाईन्सच्या मुस्लिम बक्रस्तानात हिंदू बांधवांवर अंत्यसंस्कार… 

कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जग त्रासलंय. कोरोना रुग्णांचा आकडा कमी होण्याचं नाव नाहीये. कोरोनावर औषधं तर शोधली जातायत सोबतच जगभरात कोरोना व्हायरसपासून स्वतःचा बचाव कसा करायचा यावर देखील संशीधन होतंय. अशात समोर येणाऱ्या संशोधानापैकी हेही एक महत्त्वाचं संशोधन.   

fabulous invention by IIT student and professor made deodorant cum sanitizer spray

Source by [author_name]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)