भारतीय नौदल: भारत-चीन तणाव : पश्चिम कमांडच्या युद्धनौका ‘मोहिमे’वर – warships of western command on expedition

0
20
Spread the love

म. टा. प्रतिनिधी, मुंबई :

पश्चिम कमांड मधील महत्त्वाच्या युद्वनौका मोहिमेवर धाडण्यात आल्या आहेत. चीनच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर भारतीय महासागर क्षेत्रावर करडी नजर ठेवण्यासाठी नौदलाने हा निर्णय घेतला आहे. चीनबाबत लष्कर व हवाई दलाला सज्जतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र आता चीनकडून समुद्रात कारवाया होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने नौदलाने गस्त वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

पश्चिम नौदल कमांडला चीनच्या सागरी कारवायांबाबत दक्षतेच्या सूचना देण्यात आल्या असून, कमांडमधील नौकादेखील गस्तीसाठी धाडण्यात आल्या आहेत.

– चीनकडून समुद्री कारवायांची शक्यता

– भारतीय महासागर क्षेत्रावर करडी नजर

– विनाशिका, फ्रिगेटही गस्त घालणार

कमांडमधील उच्चाधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘नौदल मुख्यालयाने संपूर्ण भारतीय महासागर क्षेत्रावर गस्त घालण्याच्या सूचना दिल्या आहेत. भारतीय महासागर क्षेत्र आफ्रिका किनारपट्टीजवळील सोमालियापासून ते दक्षिण पूर्वेकडील सिंगापूरपर्यंत आहे. आफ्रिकेजवळील समुद्रात पश्चिम कमांडच्या नौका कायम गस्तीवर असतातच. यामुळेच आता नवीन सूचनेनुसार सर्व महत्त्वाच्या नौका अरबी समुद्रमार्गे भारतीय महासागर क्षेत्रात गस्तीसाठी धाडण्यात आल्या आहेत.’ पश्चिम कमांडचे मुख्यालय मुंबईत आहेत. कमांडमधील बहुतांश नौका मुंबईतच तैनात असतात. सर्वाधिक सक्षम असलेल्या सहा विनाशिकांचा मुख्य तळ मुंबईतच आहे. सहापैकी तीन विनाशिकांची सध्या दुरुस्ती सुरू आहे. परंतु उर्वरित विनाशिकांना तातडीने गस्तीवर धाडण्यात आले आहे. याखेरीज ‘आयएनएस तलवार‘ व ‘आयएनएस तेग‘ श्रेणीतील चार फ्रिगेटही गस्तीवर पाठविण्यात आल्या आहेत. कर्नाटकमधील कारवार येथील तळदेखील पश्चिम कमांडअंतर्गत आहे. कारवार तळावरूनही काही नौका तत्काळ मोहिमेवर पाठविण्यात आल्या आहेत.

चार कमांडची एकात्मिक गस्त

चीनकडून आगळीक झाल्यास त्याचा सामना करण्यासाठी नौदलाच्या चार कमांडद्वारे एकात्मिक गस्त सुरू झाली आहे. त्यामध्ये पश्चिम, दक्षिण, पूर्व व अंदमान येथे मुख्यालय असलेल्या लष्कराच्या एकात्मिक कमांडचा समावेश आहे. या चारही कमांडअंतर्गत भारतीय महासागर क्षेत्रावर करडी गस्त सुरू झाली आहे, असे नौदल अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)