मोनोरेल: Boycott China : भारतीय कंपन्या मोनोसाठी सरसावल्या – indian companies rushed for mono

0
26
Spread the love

म. टा. प्रतिनिधी, मुंबई :

मोनोरेलचे दहा रॅक तयार करण्यासाठी चिनी कंपन्यांना देण्यात आलेले कंत्राट एमएमआरडीएने गेल्या महिन्यात रद्द केले होते. हे कंत्राट भारतीय कंपन्यांना देण्याबाबत प्राधिकरण विचाराधीन असल्याचे आयुक्त आर. ए. राजीव यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार मोनोरेलच्या डब्यांचे संकल्पचित्र, उत्पादन, पुरवठा आणि चाचणीसंबंधित कामांचे ५०० कोटी रुपयांचे कंत्राट मिळवण्यासाठी आता तीन भारतीय कंपन्यांनी तयारी दर्शवल्याचे कळते आहे.

भारत-चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशभरात अनेक प्रकल्पांमध्ये चिनी कंपन्यांची कंत्राट रद्द करण्यात आली आहेत. यामध्ये एमएमआरडीएच्या मोनोरेल डब्यांच्या बांधणीसंबंधित कंत्राटाचाही समावेश आहे. निविदापूर्व बैठकीमध्ये निविदेतील अटी आणि शर्ती मान्य करूनही पात्रता निकषांमध्ये सुधारणा करण्याबाबत कंपन्याकडून वारंवार मागणी होत असल्याने बिल्ड युवर ड्रीम, चीन रेल रोड कॉर्पोरेशन या दोन चिनी कंपन्यांना ‘नारळ’ देण्यात आला होता. यानंतर ही निविदा तत्काळ रद्द करून फेरनिविदा काढण्याचा निर्णय घेत या कामाचा किमान १० वर्षांचा अनुभव असलेल्या आणि उत्पादनक्षमता असलेल्या भारतीय कंपन्यांकडून हे काम करून घेण्याचा निर्णय एमएमआरडीएतर्फे घेण्यात आला. तसेच, मेट्रो प्रकल्पांसाठी मेक इन इंडिया अंतर्गत मेट्रोचे डबे तयार करत असलेल्या भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (BEML) तसेच भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड (BHEL) या कंपन्यांसोबत चर्चा सुरू करण्यात आली. त्यानुसार बीईएमएल, बीएचईएल या कंपन्यांसह ‘तितागड वॅगन्स‘ या भारतीय कंपनीने मोनोच्या डबेनिर्मितीबाबत तयारी दर्शवली आहे. लवकरच कंपनीच्या क्षमतेचा विचार करून प्रकल्प अंमलबजावणीची धुरा सोपवली जाईल.

‘स्कोमी’चा अनुभव गाठीशी

मोनोरेल प्रकल्प सुरुवातीपासूनच एमएमआरडीए प्रशासनाला फारसा मानवलेला दिसत नाही. यापूर्वी मोनोचे व्यवस्थापन स्कोमी कंपनी करत होती. मात्र ही कंपनी दिवाळखोरीत निघाल्यानंतर ती धुरा प्राधिकरणाने आपल्या हाती घेतली. मात्र स्कोमी कंपनीने सुट्या भागांबाबत जणू मक्तेदारी निर्माण केली होती. त्यामुळे नव्या कंपनीला जबाबदारी देताना केवळ सुट्या भागांचे कंत्राट देणे शक्य नसल्याने मोनोरेल डब्याचे संकल्पचित्रच नव्याने तयार करणे भाग असल्याचे प्रशासनाला लक्षात आले. त्यानुसार मोनो डब्यांचे संकल्पचित्र, उत्पादन, पुरवठा आणि चाचण्या नव्याने कराव्या लागणार आहे. यासाठी जानेवारीमध्ये ५०० कोटींची निविदा काढण्यात आली होती.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)