या उपायांद्वारे तुमचा अ‍ॅपेंडिक्सचा त्रास दूर करा

0
64
Spread the love

पुणे : अपेंडिसाइटिस हे नाव तुम्ही आजवर अनेकदा ऐकलं असेल. जसं याचं नाव आहे तसाच हा आजार देखील भयानक आहे. अ‍ॅपेंडिक्स हा आपल्या शरीरातील एक अवयव असून त्याला सूज आल्यास अपेंडिसाइटिसची समस्या निर्माण होते. अपेंडिसाइटिसची व्याधी हि खूप काळ व्यक्तीला त्रास देते. याच्या वेदना सहन करण्यापलीकडे असतात. तुम्ही कधी अपेंडिसाइटिस असणाऱ्या व्यक्तीला भेट दिलीत तर त्याचा त्रास तुम्हाला बघवणारही नाही. हा असा आजार आहे ज्याचा त्रास माणसाची जगण्याची इच्छा मारून टाकतो. 

१ एरंडेल तेल… 
एरंडेल तेल हे आयुर्वेदात सुद्धा खूप गुणकारी असल्याचे सांगितले आहे. फार पूर्वीपासून एरंडेल तेलाचा विविध आजारांवर आणि समस्यांवर उपयोग होत आला आहे. असं हे एरंडेल तेल अ‍ॅपेंडिक्सच्या सुजेवर आणि वेदनेवर अतिशय उपयुक्त ठरते. एरंडेल तेलात रिसिनोलिक अॅसिड आढळते. ज्यात वेदना कमी करणारे आणि सूज कमी करणारे गुणधर्म व घटक असतात. एक मऊ कापड घ्यावे आणि दोन चमचा एरंडेल तेलात हा कपडा बुडवून काही वेळ ज्या ठिकाणी सूज आली आहे आणि वेदना होत आहे.  त्या भागावर लावावा. दिवसातून दोन वेळा असे केल्यास काही दिवसांत तुम्हाला यावर फरक दिसून येईल.

२ अॅप्पल सायडर व्हिनेगर…  
हा एक विविध आजारांवर फायदेशीर असलेला पदार्थ आहे. अॅप्पल साईड व्हिनेगरमध्ये सूज कमी करणारे गुणधर्म असतात. जे अपेंडिक्‍सच्या सुजेवर अतिशय रामबाण ठरतात. एक ग्लास गरम पाण्यात अॅप्पल साईड व्हिनेगर मिसळून एक एक घोट करत ते पाणी प्यावे. जर तुम्हाला अपेंडिक्‍सची वेदना असह्य होत असेल तर तुम्ही आवर्जून हा उपाय वापरला पाहिजे. कारण आजवर अनेकांना या उपायामुळे वेदनेपासून खूप आराम मिळाला आहे.

हेही वाचा : क्लॅप क्लॅप क्लॅप क्लॅपिंग थेरपी 

३  लसूण … 
हा आपल्या रोजच्या आहारातील मुख्य पदार्थांपैकी एक आहे. त्यामुळे वर सांगितल्या पैकी एकही पदार्थ तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर तुम्ही लसणाचा वापर आवर्जून करू शकता. लसणात सूज विरोधी आणि माइक्रोबियल विरोधी गुणधर्म असतात. यातील सूज विरोधी गुणधर्म अपेंडिक्‍सवरची सूज कमी करतात आणि माइक्रोबियल विरोधी गुणधर्म हे विषाणू आणि संक्रमणापासून रक्षण करतात. लसणाच्या एक ते दोन पाकळ्या घेऊन त्या वाटून पाण्यात मिसळून ते पाणी प्यावे.

४ अ‍ॅपेंडिक्सवर बेकिंग सोडा…  
बेकिंग सोडा देखील रामबाण उपाय आहे हे वाचून बऱ्याच जणांना आश्चर्य वाटेल, पण ही गोष्ट अगदी खरी आहे. बेकिंग सोड्यामध्ये सूज विरोधी गुणधर्म असतात जे अ‍ॅपेंडिक्सची सूज कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. बेकिंग सोड्याच्या सेवनामुळे पचन शक्तीला आराम मिळतो आणि अ‍ॅपेंडिक्सच्या वेदना सुद्धा कमी होतात. एक ग्लास पाण्यात बेकिंग सोडा मिसळून प्यावा. जेव्हा जेव्हा वेदना सुरु होतील तेव्हा तेव्हा या मिश्रणाचे सेवन करावे.

५ ताक …
हे तुमचं आवडतं पेय असेल आणि तुम्हाला अ‍ॅपेंडिक्सच्या वेदनेपासून सुटका हवी असेल तर मंडळी हा उपाय खास तुमच्यासाठीच आहे असं समजा. ताक हे आपण पितो आपल्या शरीराची पचन यंत्रणा सुधारण्यासाठी, म्हणूनच जेवल्यानंतर अनेक जण ताक पितात. याशिवाय हे ताक आपल्या पचन यंत्रणेला कोणत्याही प्रकारच्या संक्रमणापासून लढण्यासाठी सक्षम बनवते. तज्ञ सांगतात की ज्यांना अ‍ॅपेंडिक्सची समस्या आहे त्यांनी दिवसातून किमान १ लिटर ताक प्यायलाच हवे. यात जिरे, पुदिना मिसळून प्यायल्यास अजून चांगला फायदा दिसतो.

संपादन – सुस्मिता वडतिले

Source by [author_name]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)