रिकाम्या पोटी 'या' पदार्थांचे सेवन टाळा, शरिराला आहेत अपायकारक

0
64
Spread the love

पुणे – आरोग्य सदृढ बनवण्यासाठी अनेकजण डाएट फॉलो करतात. काहीजण सकाळी अनेक प्रकारची फळे खातात. तर काहीजण नाश्त्याला मोड आलेली कडधान्ये, ड्रायफ्रूट्स खातात. मात्र आरोग्य सुधारण्यासाठी रिकाम्या पोटी काही पदार्थ खाणं शरीराला हानीकारक ठरू शकतं. यामुळे पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो. तसंच अनेक आजारांना आमंत्रण मिळू शकतं. त्यामुळे रिकाम्या पोटी काही पदार्थ खाणे टाळा. 

पेरू खाणे टाळा
तुमची पचनशक्ती चांगली नसेल तर जास्त पेरू खाऊ नये. याचे जास्त सेवन केल्यानं पोट फुगणे किंवा अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो. पेरु रिकाम्या पोटी खाऊ नये. थंडीच्या दिवसात रिकाम्या पोटी खाल्ल्यास पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे शक्यतो पेरू रिकाम्या पोटी खाणे टाळावे.

हे वाचा – पाच असे पदार्थ जे जगभरात मानले जातात हेल्दी, तुमच्याही जेवणात असायलाच हवेत

टोमॅटो रिकाम्या पोटी खाणे त्रासदायक
टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी असतं. अनेक लोक सकाळी रिकाम्या पोटी कच्चे टोमॅटो खातात. मात्र उन्हाळ्यात रिकाम्या पोटी टोमॅटोचं सेवन करणं आरोग्यासाठी घातक असतं. तसंच टोमॅटोच्या अशा सेवनाने अॅसिडिटीचाही त्रास होऊ शकतो. 

आंबट फळे उपाशीपोटी टाळा
काहींना सकाळी फळे खाण्याचाही सल्ला दिला जातो. मात्र सकाळी इतर काही खाण्याआदी आंबट आणि फायबरयुक्त फळे खाणं टाळलं पाहिजे. पेरू, संत्री अशी फळे सकाळी खाऊ नयेत. याचा पचनशक्तीवर विपरीत परिणाम होतो. तसंच दहीसुद्धा रिकाम्यापोटी खाऊ नये. याचाही आरोग्यावर परिणाम होतो. 

हे वाचा – डोळ्यांचे आरोग्य जपण्यासाठी कसा असावा आहार? जाणून घ्या

फक्त चहा, कॉफी अपायकारक
सकाळी चहा किंवा कॉफी पिण्याची सवय जवळपास प्रत्येकालाच असते. मात्र फक्त चहा किंवा कॉफी घेऊ नये. ज्या लोकांना अॅसिडिटीचा त्रास आहे त्यांनी चहा, कॉफीसोबत बिस्किट, ब्रेड खावे. तसंच जास्त भूक लागली असेल तेव्हाही चहा घेणं टाळावं. रिकाम्या पोटी चहा कॉफी आऱोग्यासाठी अपायकारक असते. 

(लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारीत आहे. याबाबत तज्ज्ञांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Source by [author_name]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)