रेल्वेचे खासगीकरण: औरंगाबादहून मुंबईसाठी खासगी रेल्वे सेवा – private train service from aurangabad to mumbai

0
22
Spread the love

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

केंद्र शासनाने रेल्वेचे खासगीकरण करण्यास सुरुवात केली आहे. रेल्वे विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार औरंगाबाद ते मुंबई या मार्गावर खासगी रेल्वे चालविण्यात येणार आहे. याशिवाय नांदेडहूनही मुंबईला रेल्वे सोडण्यात येणार आहे.

खासगी कंत्राटदारांमार्फत रेल्वे चालविण्यासाठी १२ कल्स्टर तयार केले आहेत. मुंबईहून सोडण्यात येणाऱ्या खासगी रेल्वेच्या यादीत नांदेड-मुंबई, मुंबई-नांदेडसह अकोला-मुंबई आणि मुंबई-अकोला या दोन रेल्वेचा समावेश आहे. याशिवाय शिर्डी-मुंबई ही रेल्वेही चालविण्यात येणार आहे. नांदेड-मुंबई ही रेल्वे ११ तासात सोडण्यात येणार असल्याचीही माहिती समोर आली आहे.

औरंगाबादहून मुंबईला जाणाऱ्या जनशताब्दी रेल्वेच्या वेळेवर खासगी रेलवे सोडण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. सकाळी ही रेल्वे ६.१५ वाजता मुंबईकडे निघेल. मुंबईला ही रेल्वे दुपारी १२.२५ वाजता पोहोचणार आहे. तसेच मुंबईहून ही रेल्वे दुपारी ३.४५ वाजता निघेल औरंगाबादला ही रेल्वे ९.४५ वाजता पोहोचणार आहे. सध्याच्या मुंबई रेल्वेपेक्षा या खासगी रेल्वेला वेळ कमी लागणार आहे.

अधिकृत माहिती नाही

खासगी रेल्वेबाबत रेल्वे बोर्डाने निर्णय घेतला आहे. कोणत्या रेल्वे चालणार आहे. कोणत्या मार्गावर चालविण्यात येणार आहे. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही, अशी माहिती नांदेड रेल्वे विभागाकडून देण्यात आली.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)