विकास दुबे: विकास दुबेवर ५० हजारांचं बक्षीस जाहीर, आई म्हणाली ‘ठार करा’ – up police announced award of 50 thousand on wanted historysheeter and main accused of kanpur encounter vikas dube

0
26
Spread the love

कानपूर : उत्तर प्रदेश पोलिसांकडून हत्यारं हिसकावून त्यांच्यावरच गोळीबार करणाऱ्या कानपूर एन्काऊन्टर प्रकरणातला आरोपी विकास दुबे याच्यावर बक्षीस जाहीर केलंय. विकास दुबे याची माहिती देणाऱ्याला ५० हजारांचं बक्षीस देण्यात येणार आहे. विकास दुबे याच्याबद्दल सूचना देण्यासाठी पोलिसांनी एक मोबाईल नंबरही जारी केलाय.

कानपूरमध्ये नऊ पोलीस कर्मचाऱ्यांची विकास दुबेनं हत्या केली. दुबेची माहिती देण्यासाठी नागरिकांनी ९४५४४००२११ या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय.

गुरुवार-शुक्रवारच्या रात्री हिस्ट्रीशीटर विकास दुबे याला अटक करण्यासाठी कानपूर ग्रामीणच्या शिवली स्टेशन परिसरातील बिकरू गावात पोलिसांची एक टीम दाखल झाली होती. या टीमवर दुबेच्या टीमकडून अंदाधुंद फायरिंग करण्यात आली. या गोळीबारात एका पोलीस उपाध्यक्षासहीत आठ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला तर इतर सात जण गंभीर जखमी झाले. तसंच शुक्रवारी सकाळी पोलिसांनी दुबेच्या दोन साथीदारांना टीपलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुंडांनी पोलिसांकडून एक एके ४७ रायफल, एक इन्सास रायफल, एक ग्लाक पिस्तूल तसंच दोन ९ एमएम पिस्तूल पळवली होती. सकाळी ठार करण्यात आलेल्या दोन गुंडापैंकी एकाकडून पोलिसांकडून हिसकावून घेण्यात आलेलं एक हत्यार जप्त करण्यात आलंय.

वाचा :कानपूरमध्ये पोलिसांवर मोठा हल्ला; चकमकीत ८ पोलिस शहीद
वाचा : कानपूर एन्काउंटर: कोण आहे विकास दुबे? जाणून घ्या

गोळ्या घालून ठार केलं पाहिजे : आईची प्रतिक्रिया

पोलिसांवर केलेल्या या हल्ल्यानंतर दुबे त्याच्या इतर साथीदारांसहीत फरार झालाय. विकास दुबेची धरपकड करण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी छापे मारलेत. लखनऊच्या कृष्णा नगर भागातील दुबेच्या घरावरही छापा मारण्यात आला. पोलिसांची शोधमोहीम सुरू आहे. पोलिसांच्यासोबतच स्पेशल टास्क फोर्सची एक टीमही दुबेच्या शोधात आहे.

दरम्यान, पोलिसांची एक टीम दुबेच्या लखनऊच्या कृष्णा नगर भागात पोहचली होती. इथं दुबेची आई आपल्या छोट्या मुलासोबत राहते. दुबेच्या वृद्ध आईला आपल्या मुलाची करणी माहीत पडल्यानंतर तिनंही दुबेला ‘गोळ्या घालून ठार केलं पाहिजे’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केलीय. विकास दुबे हा अगोदर भाजपचा कार्यकर्ता होता. त्यानंतर त्यानं बसपा आणि नंतर सपाचा मार्ग निवडला. गावकरी आणि राजकारणानं त्याला या मार्गावर आणून सोडल्याचं दुबेच्या आईनं म्हटलं.

‘असाच पळत लपत छपत राहील तर पोलीस त्याला एन्काऊंटरमध्ये ठार करतील. त्यानंच स्वत:हून पोलिसांसमोर समर्पण करावं. मी तर म्हणते त्याला पकडा आणि एन्काऊन्टरमध्ये ठार करा. त्यानं खूपच वाईट कृत्य केलंय’ अशी प्रतिक्रिया या वृद्ध मातेनं आपल्याच मुलाविषयी व्यक्त केली.

वाचा :आख्खं कुटुंब झोपेत होतं, चौघांची निर्घृण हत्या; प्रयागराज हादरलं
वाचा :गर्लफ्रेंड क्वारंटाइनमध्ये; भेटू दिलं नाही म्हणून तरुणानं असं काही केलं की…

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)