शेतकरी कर्जमुक्तीसाठी आणखी १३०६ कोटी

0
33
Spread the love

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

दोन लाखांपर्यंत कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणाऱ्या महात्मा फुले योजनेतून आतापर्यंत राज्यातील २५ लाख ७७ हजार खातेदारांना लाभ झाला आहे. त्यासाठी १६ हजार ६९० कोटींचा देण्यात आला आहे. या योजनेसाठी आणखी एक हजार ३०६ कोटी निधी वितरित करण्यास बुधवारी मान्यता देण्यात आली.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत सन २०२०-२१ साठी सात हजार कोटी रुपये निधी अर्थसंकल्पित करण्यात आला आहे. या निधीतून यापूर्वी वितरित केलेला निधी वगळता एक हजार ३०६ कोटींचा निधी वितरित करण्यास सरकारने मान्यता दिली. आतापर्यंत राज्यातील २५.७७ लाख खातेदारांना १६ हजार ६९० कोटींचा कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आला आहे, अशी यांनी दिली.

राज्यात १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९पर्यंतच्या कालावधीसाठी अल्पमुदतीचे पीक कर्ज घेतलेल्या, तसेच या कालावधीत अल्पमुदतीच्या पीककर्जाचे पुनर्गठन, फेरपुनर्गठन केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ ही कर्जमुक्ती योजना जाहीर करण्यात आली होती. या योजनेची अंमलबजावणी सुरू असताना देशासह राज्यात करोनाचे महासंकट आले. त्यामुळे राज्यामध्ये लॉकडाउन जाहीर झाला.

करोनाचा प्राद्रुर्भाव रोखण्यासाठी सुरक्षित अंतर ठेवणे गरजेचे होते. त्यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये काही अडचणी निर्माण झाल्या होत्या. तिसऱ्या यादीतील पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळण्यास उशीर झाला होता. या कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीला गती देण्यात आली असून, ज्या शेतकऱ्यांचे आधारकार्ड प्रमाणिकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्या पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. जुलैअखेरपर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळेल, असे पाटील यांनी सांगितल

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)