सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात ‘या’ मजुराचा काय संबंध? शेकडो कॉल्समुळे झालाय त्रस्त | MP Labourer flooded with calls on phone over actor Sushant Singh Rajput’s death sas 89

0
26
Spread the love

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सोशल मिडियावर अनेक अफवा पसरत आहेत. पण यामुळे मध्य प्रदेशच्या इंदुरचा एक मजुर चांगलाच वैतागलाय. याला कारण ठरलंय सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेच्या नावाने फेसबुकवर असलेलं फेक पेज. अंकिता लोखंडे मूळ इंदुरची असून तिच्या नावाने असलेल्या फेक फेसबुक पेजमुळे हा २० वर्षीय मजुर त्रस्त झालाय.

इंदुरचा हा मजुर सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर आपल्या मोबाइल फोनवर अनोळख्या क्रमांकावरुन सतत येणाऱ्या शेकडो कॉल्समुळे वैतागला आहे. कारण टीव्ही अभिनेत्री अंकिताच्या नावाने फेसबुकवर कोणीतरी फेक पेज बनवलं असून त्यात ‘अबाउट सेक्शन’मध्ये मजुराचा मोबाइल नंबर टाकलाय. त्यामुळे अंकिताचा नंबर समजून त्याला अनेकजण फोन करतायेत.

मजुराने पोलिसांकडे याबाबत तक्रार केली आहे. “अंकिता लोखंडेच्या नावाने असलेल्या फेक फेसबुक पेजवर अबाउट सेक्शनमध्ये मजुराचा नंबर देण्यात आला आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याला अनेक कॉल्स येतायेत. काही त्याचा आवाज ऐकून चुकीचा नंबर असल्याचं समजल्यानंतर फोन कट करतात, पण काही सुशांतच्या आत्महत्येबाबत संतापात बोलतात”, असे इंदुर सायबर सेलचे पोलिस अधीक्षक जितेंद्र सिंग यांनी याप्रकरणाची माहिती देताना सांगितले. याबाबतचा तपास सुरू असून ४० हजार युजर त्या फेक पेजचे फॉलोअर्स आहेत. फेक पेज ऑपरेट करणाऱ्याला मेसेंजरद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असंही त्यांनी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 8, 2020 8:28 am

Web Title: mp labourer flooded with calls on phone over actor sushant singh rajputs death sas 89Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)