हिरेजडीत मास्क: ‘हिरजडीत मास्क’चा ट्रेन्ड, पाहिलेत का? – diamond studded masks worth lakhs are a hit in surat

0
22
Spread the love

सूरत, गुजरात : करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे इतर व्यापाऱ्यांप्रमाणेच सोन्याच्या व्यापाऱ्यांनाही मोठा तोटा सहन करावा लागतोय. अशा वेळी काही तरी नवीन आयडिया लढवण्यासाठी त्यांना भाग पाडलंय. सूरतमध्ये एका व्यापाऱ्यानं हिरेजडीत मास्क (Diamond Mask) बनवून या संकटाचं रुपांतर संधीत केलंय. या मास्कची किंमत लाखोंच्या घरात आहे.

प्रदूषणापासून बचावासाठी वापरण्यात येणारा मास्क आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनेल, याची कधी कुणी कल्पनाही केली नसेल. परंतु, करोना संसर्गामुळे ही वेळ जगातल्या प्रत्येकावर येऊन ठेपलीय. आता मास्क ही गरज बनल्यावर त्याची मागणीही वाढणार… तर यावरही प्रयोग करणं गरजेचं आहे.


असाच एक प्रयोग सूरतच्या एका हिरेव्यापारी दीपक चौकसी यांनी केला आणि हिरेजडीत मास्क ग्राहकांच्या समोर आला. करोना प्रादुर्भावापासून वाचण्यासाठी वापरण्यात येणारा एन-९५ तसंच ३ प्लाय प्रोटेक्शन मास्कवर ही हिऱ्यांची रचना करण्यात आलीय.

या मास्कमध्ये खरे आणि सिंथेटीक असे दोन्हीही हिरे लावण्यात आल्याचं हिरे व्यापाऱ्यानं म्हटलंय. वेगवेगळ्या आकाराचे हे मास्क ग्राहकांच्याही पसंतीस उतरत आहेत.

चौकसी यांच्या म्हणण्यानुसार, ग्राहकांकडून लग्नासाठी वेगळ्या डिझाईनची मागणी केली. त्यामुळे, वधु आणि वरासाठी प्रथम हे हिरेजडीत मास्क तयार करण्यात आले. मास्कवर पातळ गोल्ड कास्केट फिट केलं जातं त्यानंतर त्यावर हिरे सजवले जातात.

सिंथेटीक हिऱ्यांच्या मास्कच्या किंमती एक ते दीड लाखांपर्यंत आहे तर खऱ्या हिऱ्यांच्या मास्कची किंमत जवळपास साडे चार लाखांच्या घरात जाते. ग्राहकांच्या मागणीनुसार आणि आर्थिक क्षमतेनुसार, मास्कवर १५० ते ४०० हिरे जडवले जातात.

करोनाकाळात सोनं आणि हिऱ्यांच्या दागिन्यांच्या किंमतीत जवळपास २० टक्क्यांची घट दिसून आल्याचं या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगत आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या कल्पनांद्वारे ग्राहकांना पुन्हा एकदा सोन्या-हिऱ्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातोय.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)