1828 corona cases in akola till date scj 81, 31 new cases found today scj 81 | अकोल्यात करोनाच्या रुगसंख्येने ओलांडला १८०० चा टप्पा

0
30
Spread the love

लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : जिल्ह्यात रुग्ण वाढीचे सत्र कायम असून, गुरुवारी आणखी ३१ रुग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्येने अठराशेचा टप्पा ओलांडला असून ती १८२८ झाली. शहरीसह ग्रामीण भागातही करोनाचा प्रसार वेगाने होत आहे.

जिल्ह्यात करोनाचा संसर्ग सातत्याने पसरत आहे. गत काही दिवसांत रुग्ण संख्या वाढीसोबतच मृत्यूचे प्रमाणही चांगलेच वाढले. सुदैवाने आज मृत्यूची नोंद झाली नाही. जिल्ह्यातील एकूण ४१८ तपासणी अहवाल आज प्राप्त झाले. त्यापैकी ३८७ अहवाल नकारात्मक, तर ३१ अहवाल सकारात्मक आले आहेत. सध्या ३६८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ९१ जणांचा मृत्यू झाला असून, त्यात एका आत्महत्येचा समावेश आहे. आजपर्यंत एकूण १३६७६ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे १३२५७, फेरतपासणीचे १५७ तर वैद्याकीय कर्मचाºयांचे २६२ नमुने होते. आजपर्यंत एकूण १३५३५ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण नकारात्मक अहवालांची संख्या ११७२८ तर सकारात्मक अहवाल रॅपिट टेस्टचे २१ मिळून १८२८ आहेत.

आज दिवसभरात ३१ जणांचे अहवाल सकारात्मक आले आहेत. सकाळी २५ नवे रुग्ण आढळून आले. त्यात सहा महिला व १९ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील अकोट येथील सहा जण, बाळापूर येथील पाच जण, महान, खोलेश्वार येथील प्रत्येकी तीन जण, चांदूर येथील दोन जण, तर हिंगणा पारस, रजपूतपूरा, मलकापूर (अकोला), कोठारी वाटिका मलकापूर रोड, खडकी व शिवनी येथील रहिवासी प्रत्येकी एक रुग्ण आहे. सायंकाळाच्या अहवालानुसार आणखी सहा रुग्ण वाढले. त्यात दोन महिला व चार पुरुष आहेत. त्यामध्ये बोरगाव मंजू, आदर्श कॉलनी येथील प्रत्येकी दोन जण, तर तेल्हारा व अकोट येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे.
७४.८९ टक्के रुग्णांची करोनावर मात
जिल्ह्यात करोनातून बरे होण्याचे प्रमाणही चांगले आहे. आतापर्यंत ७४.८९ टक्के रुग्णांनी करोनावर मात केली आहे. आज दिवसभरात शासकीय वैद्याकीय महाविद्याालयातून आठ, तर कोविड केअर सेंटरमधून १७ अशा २५ जणांना सुट्टी देण्यात आली. आतापर्यंत जिल्ह्यातील १३६९ रुग्णांनी करोनावर विजय मिळवला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 9, 2020 8:19 pm

Web Title: 1828 corona cases in akola till date scj 81 31 new cases found today scj 81


Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)