257 new corona positive patients in navi mumbai, till date 232 deaths scj 81| नवी मुंबईत आधीच करोनाचा कहर त्यात पडली पावसाची भर

0
17
Spread the love

लोकसत्ता , प्रतिनिधी

नवी  मुंबईत  करोनाबाधितांच्या संख्येत दररोज मोठी वाढ होत असून मृतांची संख्याही दररोज वाढत आहेत. वाढत्या संसर्गामुळे   शहरात  १० दिवसाची टाळेबंदी ४ जुलैपासून सुरू होणार आहे. एकीकडे शहरात करोनाचा कहर सुरू असताना त्यात पावसाची भर पडली असून सकाळपासूनच शहरात जोरदार पाऊस पडला. आज २५७ नवे रुग्ण वाढले असून शहरात करोनाबाधितांची  एकूण संख्या ७३४५  झाली आहे.

नवी मुंबई शहरात आज आठ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून करोनामुळे मृत पावलेल्यांची एकूण संख्या २३२ झाली आहे. शहरात करोनामुक्त होण्याचा दर चांगला  असून शहरात आतापर्यंत तब्बल ४,११२ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.तर ९२८ करोना तपासणी अहवाल प्रलंबित आहेत. शहरात नेरुळमध्ये सर्वाधिक १०६.४ मिमी पावसाची नोंद झाली असून शहरात सरासरी ८८.४८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 3, 2020 9:38 pm

Web Title: 257 new corona positive patients in navi mumbai till date 232 deaths scj 81


Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)