353 new corona patients in Raigad district 4812 cases till date scj 81 | रायगड जिल्ह्यात करोनाचे ३५३ नवे रुग्ण, बाधितांची संख्या ४ हजार ८०० च्याही पुढे

0
22
Spread the love

लोकसत्ता, खास प्रतिनिधी
अलिबाग- रायगड जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव वेगाने सुरु झाला आहे. आजवरची सर्वाधिक नवी रुग्ण संख्या जिल्ह्यात नोंदविण्यात आली आहे. गेल्या चोवीस तासात तब्बल ३५३ करोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील करोना बाधितांची संख्या ४ हजार ८१२ वर पोहोचली आहे. दिवसभरात ८१ जणांनी करोनावर मात केली आहे. तर गुरुवारी उपचारादरम्यान चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात ३५३ नव्या करोना बाधितांची भर पडली आहे. यात  पनवेल मनपा हद्दीतील १८६, पनवेल ग्रामीण मधील ४७, उरण मधील १३, खालापूर ३, कर्जत ४, पेण ६, अलिबाग १९, मुरुड १३, माणगाव ७, रोहा ३३, श्रीवर्धन ७, महाड १४, पोलादपूर १ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात पनवेल मनपा हद्दीतील १, तर पेण, अलिबाग, मुरुड येथे प्रत्येकी १ रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. दिवसभरात ८१ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. जिल्ह्यातील १० हजार ५४० जणांची करोना चाचणी करण्यात आली. यातील ५ हजार ५८० जणांचे अहवाल नकारात्मक आले.

४ हजार ८१२ जणांना करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. तर १४८ जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. २६३८ जणांनी करोनावर मात केली आहे. जिल्ह्यात सध्या २ हजार ०३० करोना बाधित रुग्ण आहेत. यात पनवेल मनपा हद्दीतील ९५०, पनवेल ग्रामीण हद्दीतील ३७५, उरण मधील ६९,  खालापूर ८८, कर्जत ७०, पेण ७५, अलिबाग ७८,  मुरुड २१, माणगाव ४७, तळा येथील ३, रोहा १०३, सुधागड ३, श्रीवर्धन २१, म्हसळा ०, महाड २३, पोलादपूर मधील ४ करोना बाधिताचा समावेश आहे. जिल्ह्यात आत्ता पर्यंत १४४ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. करोनाबाधितांच्या संपर्कात आलेले ९१ हजार १४४ जणांना सध्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.

जिल्ह्यात करोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, नवीमुंबई प्रमाणे रायगड जिल्ह्यातही प्रतिंबधात्मक उपाययोजना करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 3, 2020 9:44 pm

Web Title: 353 new corona patients in raigad district 4812 cases till date scj 81


Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)