5134 new #COVID19 positive cases, 3296 discharged and 224 deaths in Maharashtra today scj 81| महाराष्ट्रात ५ हजार १३४ नवे करोना रुग्ण, २२४ मृत्यू

0
33
Spread the love

महाराष्ट्रात ५ हजार १३४ नवे करोना रुग्ण, २२४ नव्या मृ्त्यूंची नोंद गेल्या २४ तासांमध्ये झाली आहे. तर मागील २४ तासांमध्ये ३ हजार २९६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या राज्यात १ लाख १८ हजार ५५८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आतापर्यंत राज्यातील २ लाख १७ हजार १२१ एवढी झाली आहे. तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.६ टक्के इतके झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ११ लाख ६१ हजार ३११ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २ लाख १७ हजार १२१ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्याच्या घडीला राज्यात ६ लाख ३१ हजार ९८५ रुग्ण होम क्वारंटाइन आहेत. तर ४५ हजार ४५३ लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. आज पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमुळे राज्यात ८९ हजार २९४ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. मागील २४ तासांमध्ये ५ हजार १३४ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील करोना रुग्णांची संख्या २ लाख १७ हजार १२१ इतकी झाली आहे.

प्रमुख शहरांमधली अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या
मुंबई -२३ हजार ३५९
ठाणे- २९ हजार ९८८
पुणे – १४ हजार ८९२
नाशिक-२३००
औरंगाबाद-३५०६
नागपूर-४५२

अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येचा विचार केला तर मुंबईपेक्षा ठाण्यातील अॅक्टिव्ह केसेस वाढलेल्या दिसत आहेत. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली या ठिकाणी १२ जुलैपर्यंत पुन्हा एकदा लॉकडाउन लागू करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2020 8:04 pm

Web Title: 5134 new covid19 positive cases 3296 discharged and 224 deaths in maharashtra today scj 81


Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)