7 dead, 4 injured in explosion at factory in UP’s Modi Nagar bmh 90 । उत्तर प्रदेशात स्फोट होऊन ७ कामगार ठार; ४ जखमी

0
27
Spread the love

उत्तर प्रदेशातील गाजियाबादमध्ये फटाक्याच्या कारखान्यात स्फोट होऊन सात कामगार जागीच ठार झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या घटनेत चार कामगार होरपळून जखमी झाले आहेत.

गाजियाबादमधील मोदीनगर परिसरात असलेल्या फटाक्याच्या कारखान्यात दुपारी अचानक स्फोट झाला. दुपारी कामगार फटाके बनवण्याचे काम करत होते. यावेळी कारखान्यात ३० कामगार काम करत होते. त्याचवेळी अचानक भीषण स्फोट झाला. त्यानंतर भीषण आग लागली. यात सात कामगार होरपळून जागीच मरण पावले आहेत, अशी माहिती गाजियाबादचे जिल्हाधिकारी अजय शंकर पांडेय यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2020 9:00 pm

Web Title: 7 dead 4 injured in explosion at factory in ups modi nagar bmh 90Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)