aarey colony quarantine center: coronavirus : संतापजनक! मुंबईत करोना रुग्णांच्या नाश्त्यामध्ये अळ्या – larvae in the breakfast in aarey colony quarantine center

0
27
Spread the love

म. टा. प्रतिनिधी, मुंबई: गोरेगाव पूर्व आरे कॉलनीत रॉयल पाम हॉटेलमध्ये विलगीकरण केंद्रातील एका रुग्णाच्या नाश्त्यामध्ये शनिवारी सकाळी अळ्या सापडल्याने खळबळ उडाली. याच हॉलमध्ये मे महिन्यात जेवणात अळ्या सापडल्या होत्या. त्यावेळी हॉटेलला ५० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला होता.

रॉयल पाम हॉटेलमधील विलगीकरण केंद्रात सुमारे ४५० नागरिकांना ठेवण्यात आले आहे. त्यात लहान मुले आणि महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. हॉटेलमध्ये पुरवण्यात येणाऱ्या जेवणाचा दर्जा अतिशय खराब असतो, अशी तक्रार रुग्णांनी केली आहे. शनिवारी सकाळी साबुदाणा खिचडीचे बॉक्स देण्यात आले. त्यात एका रुग्णाला अळ्या सापडल्याचे गोरेगावातील भाजपच्या नगरसेविका प्रीती सातम यांनी सांगितले. या केंद्रात अनेकदा जेवण अगदी कमी प्रमाणात दिले जाते. पालिकेचे या केंद्रावर नियंत्रण आहे की नाही, असा सवाल रुग्णांनी केला आहे.

कंत्राटदारावर कारवाई करा

२२ मे रोजी जेवणात अळ्या सापडल्या होत्या. त्यावेळी पन्नास हजार रुपये दंड ठोठावून जेवण, नाश्त्याचे कंत्राट दुसऱ्या एका हॉटेल व्यावसायिकाला देण्यात आले आहे. कंत्राटदाराच्या या निष्काळजीपणाबद्दल कडक कारवाई करावी, अशी मागणी प्रीती सातम यांनी पालिकेकडे केली आहे.

मुंबईत विनाउसंत मुसळधार, आज जोर ओसरण्याची शक्यता

ऑक्टोबरपर्यंत सरकार पाडण्याच्या पैजा लागल्यानेच ‘त्या’ नियुक्त्या रखडल्या: राऊत

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)