abhishek bachchan first web series breathe into the shadows promo out ssj 93 | Video : अभिषेकच्या ‘ब्रीद : इन टू द शॅडोज’चा प्रोमो प्रदर्शित

0
23
Spread the love

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अभिनेता अभिषेक बच्चन याच्या ‘ब्रीद : इन टू द शॅडोज’ या वेबसीरिजची जोरदार चर्चा सुरु होती. या सीरिजच्या माध्यमातून अभिषेक वेब विश्वात पदार्पण करत आहे. अलिकडेच या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून या ट्रेलरमुळे अनेकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यातच आता या सीरिजचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा प्रोमो अभिनेता अभिषेक बच्चनने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमधून एका पित्याचा त्याच्या मुलीला शोधण्यासाठीचा संघर्ष दाखविण्यात आला होता. तर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये पहिल्यांदाच या सीरिजमधील खलनायकाचा आवाज प्रेक्षकांच्या कानावर पडला आहे. ‘सियाला वाचवायचं असेल तर, खेळ खेळावाच लागेल’, असं वाक्य या प्रोमोमध्ये ऐकायला येत आहे. त्यामुळे या सीरिजविषयीची उत्कंठा आणखीनच शिगेला पोहोचली आहे.

दरम्यान, सायकॉलॉजिकल क्राइम थ्रिलर असलेली ही सीरिज येत्या १० जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजमध्ये अभिषेक बच्चनसह सयामी खेर आणि निथ्या मेनन देखील झळकणार आहे. निथ्या मेननचादेखील हा डिजिटल डेब्यु असल्याचं म्हटलं जात आहे. या सीरिजची निर्मिती अबुंदंतिया एन्टरटेन्मेंट यांनी केली असून दिग्दर्शन मयांक शर्मा यांनी केलं आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2020 7:00 pm

Web Title: abhishek bachchan first web series breathe into the shadows promo out ssj 93Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)