Abhishek Bachchan reveals Aishwarya Rai emotional response to Breathe Into The Shadows trailer avb 95

0
20
Spread the love

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन ‘ब्रीद : इन टू द शॅडोज’ या वेब सीरिजमधून डिजिटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण करत आहे. ही वेब सीरिज आज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण सीरिजचा ट्रेलर पाहून ऐश्वर्याची प्रतिक्रिया कशी होती हे अभिषेकने एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे.

अभिषेकने नुकतीच पिंकव्हिलाला मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये त्याने ‘कुटुंबातील सर्वांना माझ्या वेब सीरिजचा ट्रेलर आवडला. ट्रेलर पाहून ऐश्वर्या भावूक झाल्याचे तिने मला सांगितले होते. माझ्या कुटुंबीयांतील सर्वांनाच ट्रेलर आवडला आणि ते सीरिज पाहण्यासाठी उत्सुक आहेत’ असे अभिषेकने म्हटले होते.

‘ब्रीद : इन टू द शॅडोज’ ही सीरिज सायकॉलॉजिकल क्राइम थ्रिलर आहे. ती आज म्हणजेच १० जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजमध्ये अभिषेक बच्चनसह सयामी खेर आणि निथ्या मेनन दिसणार आहे. निथ्या मेननचादेखील हा डिजिटल डेब्यु असल्याचे म्हटले जात आहे. या सीरिजची निर्मिती अबुंदंतिया एन्टरटेन्मेंट यांनी केली असून दिग्दर्शन मयांक शर्मा यांनी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2020 11:53 am

Web Title: abhishek bachchan reveals aishwarya rai emotional response to breathe into the shadows trailer avb 95Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)