actor arshad warsi calls adani highway robber after getting electric bill more than a lac ssj 93 | ‘सर्किट’लाही वाढीव विजबिलाचा शॉक! निवडला ‘हा’ मार्ग

0
35
Spread the love

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर वाढत्या वीजबिलाचा मुद्दा चांगलाच चर्चिला जात आहे. सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकांना वाढत्या वीजबिलाचा फटका बसला आहे. यात अभिनेत्री तापसी पन्नू, रेणुका शहाणे,हुमा कुरेशी या अभिनेत्रींनंतर अभिनेता अर्शद वारसीलादेखील वाढत्या बिलाचा फटका बसला आहे. याविषयी त्याने ट्विटरच्या माध्यमातून आगपाखड केली होती. मात्र त्यानंतर त्याची समस्या दूर झाली असून याविषयी त्याने ट्विट करत माहिती दिली.

‘मुन्नाभाई’ या चित्रपटात ‘सर्किट’ची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेल्या अर्शद वारसी याला एका महिन्यात तब्बल १ लाख ३ हजार ५६४ रुपये बील आलं होतं. बिलावरील आकडे पाहिल्यानंतर त्याने ‘हायवे लुटारु’ अदानी यांच्याकडून आलेलं हे माझे वीज बील असं म्हणत सोशल मीडियावर आगपाखड केली होती. त्यानंतर त्याच्या या ट्विटला ‘अदानी इलेक्ट्रिसिटी’ने रोखठोक शब्दात अर्शदला उत्तर दिलं होतं.

“वाढीव बील आल्यामुळे आम्ही तुमची चिंता समजू शकतो, याप्रकरणी आम्ही तुमची मदतही करण्यास तयार तत्पर आहोत. मात्र वैयक्तिक बदनामी करणारी टीका सहन करणार नाही”, असं प्रत्युत्तर अदानी इलेक्ट्रिसिटीकडून अर्शदला देण्यात आलं होतं. त्यानंतर अदानी इलेक्ट्रिसिटीने अर्शदची समस्या सोडविली असून अर्शदने पुन्हा एक नवीन ट्विट शेअर करत समस्या दूर झाल्याचं म्हटलं आहे.

अर्शदने ट्विट करुन समस्या दूर झाली असून सहकार्य केल्याबद्दल आभार असं म्हटलं आहे. दरम्यान, यापूर्वी कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींना लाखोंच्या घरात वीजबिल आल्याचं पाहायला मिळालं. त्यातील अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून याप्रकरणी संताप व्यक्त केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2020 1:53 pm

Web Title: actor arshad warsi calls adani highway robber after getting electric bill more than a lac ssj 93



Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)