Adhyayan Summan praises ex girlfriend Kangana Ranaut | कंगनाने काळी जादू केली म्हणणारा अध्ययन सुमन आता करतोय तिचं कौतुक

0
73
Spread the love

कंगना रणौत मला मारहाण करायची, माझ्यावर काळी जादू करायची, असे धक्कादायक आरोप करणारा तिचा पूर्वाश्रमीचा प्रियकर अध्ययन सुमन आता तिचं कौतुक करताना दिसतोय. शेखर सुमन यांचा मुलगा व अभिनेता अध्ययन याने नुकत्यात दिलेल्या एका मुलाखतीत कंगनाचं तोंडभरुन कौतुक केलं आहे.

‘बॉलिवूड बबल’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, “लोकं म्हणतात की माझ्या एक्स गर्लफ्रेंडबद्दल खूप वाईट बोलतो. पण मी हे नेहमीच स्पष्ट केलंय की मी कंगनाचा फार आदर करतो. तिने खूप काही सहन केलंय आणि इंडस्ट्रीत मानसन्मान आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी तिने खूप मेहनत घेतली आहे. इंडस्ट्रीमधल्या मोठ्या लोकांना न घाबरता त्यांच्याविरोधात लढून तिने स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलंय. लोकांसाठी ती एक आदर्श उदाहरण आहे.”

आणखी वाचा : शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट! स्टँडअप कॉमेडियननंतर मराठी अभिनेत्रीने केला महाराजांचा एकेरी उल्लेख

‘राज २ ‘या चित्रपटात अध्ययन आणि कंगना यांनी एकत्र काम केलं होतं. दोघांचं वर्षभर अफेअर होतं, मात्र नंतर ब्रेकअप झालं. त्यानंतर कंगना व हृतिक रोशनचा वाद समोर येताच अध्ययनने अनेक मुलाखतींमध्ये कंगनावर धक्कादायक आरोप केले होते. “मीदेखील ह्रतिकसारख्या परिस्थितीतून गेलोय. कंगना मला मारहाण करायची, माझ्यावर काळी जादू करायची”, असं त्याने म्हटलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2020 12:58 pm

Web Title: adhyayan summan praises ex girlfriend kangana ranaut ssv 92Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)