After Sri Lanka and UAE New Zealand offer to host IPL 13 | आयपीएलच्या आयोजनासाठी आणखी एक देश उत्सुक, बीसीसीआयला दिली ऑफर

0
24
Spread the love

जगातलं सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड अशी ओळख असलेल्या बीसीसीआयसमोर यंदाच्या आयपीएल हंगामाबद्दलचा पेच सुरु आहे. करोनामुळे बीसीसीायने यंदाचा आयपीएल हंगाम पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला आहे. मात्र ही स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला ४ हजार कोटींचं नुकसान होणार आहे, त्यामुळे बीसीसीआयने या हंगामाचं आयोजन करण्याचं ठरवलं आहे. आतापर्यंत श्रीलंका आणि UAE या दोन क्रिकेट बोर्डांनी बीसीसीआयला आयपीएलचं आयोजन करण्याची तयारी दाखवली होती. यानंतर न्यूझीलंडनेही आयपीएलचं आयोजन करण्याची तयारी दाखवली आहे.बीसीसीआय अधिकाऱ्याने पीटीआय वृत्तसंस्थेला याबद्दल माहिती दिली आहे.

“भारतात स्पर्धेचं आयोजन करणं हे बीसीसीाय समोरचं पहिलं प्राधान्य आहे. पण देशातली परिस्थिती सुधारली नाही तर यंदाची स्पर्धा देशाबाहेर आयोजित करण्याबद्दलही विचार सुरुच आहे. श्रीलंका आणि युएईनंतर न्यूझीलंडनेही आयपीएलचं आयोजन करण्याची तयारी दाखवली आहे. स्पर्धेशी संबंधित सर्व व्यक्तींशी चर्चा केल्यानंतर याबद्दल निर्णय घेतला जाईल. आयोजन कुठेही करण्यात आलं तरीही खेळाडूंची सुरक्षा हा पहिला महत्वाचा मुद्दा असणार आहे.” बीसीसीआय अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर पीटीआयला माहिती दिली.

काही दिवसांपूर्वी बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी यंदाची स्पर्धा देशाबाहेर जाणार असल्याचं सांगितलं होतं. ऑस्ट्रेलियात आयोजित टी-२० विश्वचषकाबद्दल निर्णय घेण्यासाठी आयसीसी विलंब करत असल्यामुळे बीसीसीआयला आयपीएल आयोजनाबद्दल निर्णय घेण्यासाठी उशीर होत आहे. बीसीसीआयने याबद्दल नाराजीही बोलून दाखवली. याआधीही २००९ आणि २०१४ साली आयपीएलचं आयोजन अनुक्रमे दक्षिण आफ्रिका आणि युएई मध्ये करण्यात आलं होतं. त्यामुळे आगामी दिवसांमध्ये बीसीसीआय यावर नेमका काय निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2020 6:17 pm

Web Title: after sri lanka and uae new zealand offer to host ipl 13 psd 91Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)