agrima joshua controversy: agrima joshua शिवरायांचा अपमान करणाऱ्या कॉमेडियनला मनसेचा दणका; ‘त्या’ स्टूडिओची तोडफोड – agrima joshua apologized remark on chhatrapati shivaji maharaj statement

0
30
Spread the love

मुंबईः स्टँडअप कॉमेडीयन अग्रिमा जोशुआचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली आहे. एका शोदरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या थट्टेमुळं शिवप्रेमी आणि नेटकऱ्यांनी तिच्यावर टीकेची झोड उठवली होती. अनेक राजकीय पक्षांनीही तिच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली होती. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी जोशुआ काम करत असलेल्या स्टुडिओची तोडफोड केली आहे. (Agrima Joshua Statement On Chatrapati Shivaji Maharaj)
अग्रिमा जोशुआनं शिवरायांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं समस्त शिवप्रेमींच्या व महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या असून तिच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत होती. मनसे कार्यकर्त्यांनी जोशुआ काम करत असलेल्या स्टुडिओत जाऊन तोडफोड केली आहे. मनसेचे कार्यकर्ते यन रानडे यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवर व्हिडिओ पोस्ट केला आहे. मनसेनं दणका दिल्यानंतर अग्रिमा जोशुआनं लेखी माफिनामा सादर केला आहे. जोशुआनं तिच्या ट्विटर अकाउंटवरुनही जाहीर माफी मागितली आहे. तसंच तो व्हिडिओही हटवण्यात आला आहे.
शिवरायांची थट्टा करणाऱ्या अग्रिमा जोशुआला अटक करा; शिवसेनेची मागणी

दरम्यान, अग्रिमा जोशुआनं मुंबईत अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या शिवस्मारकाबद्दल वादग्रस्त व्यक्तव्यं केली आहेत. या वक्तव्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेखही तिनं केला आहे. तिचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिवभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

करोनाला रोखणार हे यंत्र? कोल्हापुरच्या तरुणीनं बनवलं मशीन

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)