agrima joshua statement: agrima joshua शिवरायांची थट्टा करणाऱ्या अग्रिमा जोशुआला अटक करा; शिवसेनेची मागणी – agrima joshua statement on chatrapati shivaji maharaj controversy; shivsena demand arrest her

0
80
Spread the love

मुंबईः स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआचा छत्रपती शिवरायांवरील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिवप्रेमीनं तिच्यावर टीकेची झोड उठवली आहे. शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी अग्रिमा जेशुआला तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. त्यासंदर्भात एक पत्र त्यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना लिहलं आहे. (Agrima Joshua Statement On Chatrapati Shivaji Maharaj)

मुंबई पोलीस दलात ‘महा’गोंधळ; ‘त्या’ अधिकाऱ्यांच्या पुन्हा बदल्या!

शिवरायांच्या पुतळ्याचं विडंबन करून कॉमेडी सादर केली आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तिला शिवाजी महाराजांबद्दल आदर नाहीये किंवा माहिती नाहीये हे लक्षात येतं. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. शिवाजी महाराजांबद्दल अशा प्रकारचे वक्तव्य करत असेल तर ते आयोग्य आहे. यासाठी मी गृहमंत्र्यांना पत्र लिहून जोशुआला अटक करण्याची मागणी केली आहे. असं प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं आहे.

करोनाला रोखणार हे यंत्र? कोल्हापुरच्या तरुणीनं बनवलं मशीन

पैसे कमावण्यासाठी जर महाराजांचा वापर करत असशील तर महिला आघाडी व युवासेना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. यासारखे वक्तव्य महाराष्ट्रातील जनता व शिवभक्त खपवून घेतले जाणार नाहीत, अशा ईशारा आमदार सरनाईक यांनी दिला आहे.

दरम्यान, अग्रिमा जोशुआनं मुंबईत अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या शिवस्मारकाबद्दल वादग्रस्त व्यक्तव्यं केली आहेत. या वक्तव्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेखही तिनं केला आहे. तिचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिवभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

शोमध्ये काय म्हणाली अग्रिमा जोशुआ?

‘शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासंदर्भात मी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इंटरनेटवर सर्च केलं. मला एक कोणीतरी लिहिलेला भलामोठा निबंध सापडला. पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी शिवाजींचा पुतळा मास्ट्ररस्ट्रोक आहे… यामुळं महाराष्ट्रात त्यांची सत्ता येईल… तर दुसऱ्या एकाला वाटलं क्रिएटिव्हिटी कॉंन्सेंट आहे, त्यानं लिहिलं की, यात जीपीएस ट्रेकरसुद्धा असणार शिवाय त्यांच्या डोळ्यात लेझर लाईट निघेल जी अरबी समुद्रातून येणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांवर नजर ठेवेल. तर तिसऱ्या एका व्यक्तीनं शिवाजी नाही तर शिवाजी महाराज म्हणा, असं लिहिलं होतं… बस्स मी त्यालाच फॉलो केलं’, असं तिनं तिच्या शोमध्ये म्हटलं आहे.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)