Ahmedabad crime: माणसं आहेत की हैवान! पती अन् सासू-सासऱ्यांनी महिलेला पहिल्या मजल्यावरून फेकलं – ahmedabad crime 29-year-old woman alleged husband and in laws threw her off first floor for dowry

0
21
Spread the love

अहमदाबाद: माहेरच्यांकडून ५ लाख रुपये आण असे सांगून पती आणि सासू-सासऱ्यांनी २९ वर्षीय महिलेला उचलून पहिल्या मजल्यावरून खाली फेकून दिल्याची धक्कादायक घटना गुजरातमधील अहमदाबादमध्ये घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पती आणि तिच्या सासू-सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित महिला सध्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. तिने पती आणि सासू-सासऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तिघांनी मला ठार मारण्याचा प्रयत्न केला. पहिल्या मजल्यावरून या तिघांनी मला खाली फेकून दिलं, असं तिनं तक्रारीत म्हटलं आहे.

दीपिका असं या २९ वर्षीय पीडित महिलेचं नाव आहे. तिनं पती जिग्नेश, सासरे प्रवीण आणि सासू चंद्रिका या तिघांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पतीचे अन्य महिलेशी प्रेमसंबंध असल्याचा संशय असून, त्यावरून तो मारहाण करत असल्याचं तिनं तक्रारीत नमूद केलं आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून तिचा पती आणि सासू-सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती मेघानीनगर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी दिली. आम्ही या घटनेचा तपास करत आहोत. महिलेची तक्रार नोंदवून घेतली आहे. आरोपींविरोधात पुरावे मिळाल्यानंतर त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असेही पोलिसांनी सांगितले.

‘काश्मीरमध्ये सलग २ महिने रोज रात्री माझ्यावर बलात्कार झाला’

पुणे: संपवून टाकेन, सूनेनं दिली सासूला धमकी; गळाही आवळला

पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, मे २०१०मध्ये तिचा जिग्नेश याच्यासोबत विवाह झाला. या दोघांना दोन मुलं झाली. एक सात आणि एक पाच वर्षांचा आहे. ती पती, मुलं आणि सासू-सासऱ्यांसोबत राहते. ऑक्टोबर २०१९ मध्ये एक दिवस तिनं पतीचा फोन तपासून पाहिला. त्याचे दुसऱ्या महिलेसोबत प्रेमसंबंध असल्याचं त्यावरून समजलं. त्यानंतर तिनं याबाबत जिग्नेशच्या आई-वडिलांना सांगितलं. त्यावर त्याने तिला जबर मारहाण केली. तसंच ठार मारण्याची धमकी दिली. तसंच त्याच्या आई-वडिलांनीही वाद घातला आणि हुंड्यापोटी पाच लाख रुपये माहेरच्यांकडून आण असं सांगितलं. तसंच जोपर्यंत पैसे घेऊन येत नाही, तोपर्यंत घरात यायचं नाही असं सांगितलं. बुधवारी ती बहिणीसोबत फोनवर बोलत होती. ते पाहून सासू-सासरे आणि पती हे तिघेही प्रचंड संतापले. त्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. माहेरच्या मंडळींशी बोलायचं नाही असं त्यांनी बजावून सांगितलं. त्यानंतर अचानक या तिघांनी तिला उचललं आणि पहिल्या मजल्यावरून खाली फेकून दिलं, असं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. या घटनेत महिला जखमी झाली आहे. तिच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. तिच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

भयानक! ५ वर्षीय मुलीवर बलात्कार, टॉर्चर करून विहिरीत फेकलं; मुलाचीही केली हत्या

सांगली हादरलं; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची निर्घृण हत्या

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)