Ajit Pawar : ‘सारथी’चं सारथ्य आता अजित पवारांकडे; वडेट्टीवारांनी सांगितलं कारण – Deputy Cm Ajit Pawar To Look After Department Of Sarthi Instead Of Vijay Wadettiwar

0
21
Spread the love

मुंबई: मराठा संघटनांच्या आक्रमक पवित्र्यामुळं गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या ‘सारथी‘ संस्थेची सूत्रे आता खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच हातात घेतली आहेत. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आज यांनी याबाबत माहिती दिली.

वाचा: संभाजीराजेंना तिसऱ्या रांगेत स्थान! ‘सारथी’च्या बैठकीत खडाजंगी

मराठा समाजातील तरुणांच्या प्रशिक्षणासाठी व कौशल्य विकासासाठी स्थापण्यात आलेली ‘सारथी’ संस्था बंद पाडण्याचा घाट महाविकास आघाडी सरकारनं घातला आहे, असा आरोप गेल्या काही दिवसांपासून सुरू होता. ‘सारथी’ला सरकारकडून येणे असलेले शिष्यवृत्तीचे पैसे रखडले होते. त्यावरून मराठा संघटनांनी व भाजपचे खासदार संभाजीराजे भोसले यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामुळं अजित पवार यांनी आज या संदर्भात मंत्रालयात सविस्तर बैठक घेतली. त्यात ‘सारथी’च्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली. ही संस्था बंद पडू दिली जाणार नाही. संस्थेला ८ कोटींची आर्थिक मदत तातडीनं दिली जाईल, अशी ग्वाही अजित पवार यांनी बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

वाचा: अमृता फडणवीस पुन्हा चर्चेत! कारण ठरले ‘ते’ तीन शब्द

‘सारथी’च्या अनुषंगानं विरोधकांसह काही संघटनांनी वडेट्टीवारांनाही लक्ष्य केलं होतं. त्यामुळं त्रस्त झालेल्या वडेट्टीवारांनी मी ओबीसी असल्यामुळं मला लक्ष केलं जात असल्याचा आरोप केला होता. तसंच, मुख्यमंत्र्यांना सांगून हा विभाग एखाद्या मराठा मंत्र्याकडं देण्याची तयारीही त्यांनी दाखवली होती. त्यावर मराठा आणि ओबीसींमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करू नका, असा इशारा संभाजीराजेंनी दिला होता.

maharashtra times

वाचा: ‘आम्ही त्यांच्यासारखं राजकारण करत नाही, ते घरात बसलेत’

त्या पार्श्वभूमीवर ‘सारथी’चं काम अजित पवार यांच्याकडं देण्याचा निर्णय झाला. खुद्द विजय वडेट्टीवार यांनीच ही माहिती दिली. ‘सारथीचं काम यापुढं अधिक वेगवान व्हावं म्हणून मी स्वत: अजितदादांना तशी विनंती केली होती. माझ्याकडचा विभाग काढून घेतला असा गैरसमज कोणीही करून घेऊ नये. राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांच्याकडं असलेल्या अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचा कारभारही अजित पवार यांच्याकडं देण्यात आला आहे. त्यामुळं ह्या दोन्ही विभागाची कामं आता सुस्साट वेगानं पुढं जातील, असा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.

maharashtra times

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)