Akola, 81, including 69 prisoners, corona free abn 97 | अकोल्यात ६९ कैद्यांसह ८१ जण करोनामुक्त

0
27
Spread the love

जिल्हय़ात आणखी २१ नवे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे जिल्हय़ातील एकूण रुग्ण संख्या १८४९ झाली. दरम्यान, शुक्रवारी ६९ कैद्यांसह ८१ जण करोनामुक्त केल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली.

जिल्हय़ात करोनाचा प्रकोप सुरूच असून, रुग्ण संख्या वाढीचा वेग कायम आहे. सुदैवाने आजही मृत्यूची नोंद झाली नाही. जिल्हय़ातील एकूण २३० तपासणी अहवाल आज प्राप्त झाले. त्यापैकी २०९ अहवाल नकारात्मक, तर २१ अहवाल सकारात्मक आले आहेत. सध्या ३०८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्हय़ात आतापर्यंत ९१ जणांचा मृत्यू झाला असून, त्यात एका आत्महत्येचा समावेश आहे. आज दिवसभरात ८१ जणांना सुट्टी देण्यात आली. पीकेव्ही कोविड केअर सेंटरमधून पाच, सवरेपचार रुग्णालयातून सात जणांना सोडण्यात आले. जिल्हा कारागृहातील कोविड केअर सेंटरमधील ६९ जण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यांची कारागृहातच स्वतंत्र व्यवस्था व देखभाल केली जात आहे. आतापर्यंत जिल्हय़ातील १४५० रुग्णांनी करोनावर विजय मिळवला.

आज दिवसभरात २१ जणांचे अहवाल सकारात्मक आले. सकाळी प्राप्त अहवालात १३ जण बाधित आढळून आले. त्यात सहा महिला व सात पुरुष आहेत. त्यामध्ये अकोट, बाळापूर प्रत्येकी तीन, बार्शिटाकळी, कृषीनगर प्रत्येकी दोन तर तारफैल, कावसा ता. अकोट व पातूर येथील रहिवासी प्रत्येकी एक रुग्ण आहे. सायंकाळी आणखी आठ जणांचे अहवाल सकारात्मक आले. त्यात एक महिला व सात पुरुष आहेत. त्यामध्ये कंवरनगर येथील चार जण, तर बाळापूर, बोरगाव, सिंधी कॅम्प व मोठी उमरी येथील रहिवासी प्रत्येकी एक रुग्ण आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2020 12:19 am

Web Title: akola 81 including 69 prisoners corona free abn 97


Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)