Akshay kumar nashik tour in controversy nck 90

0
26
Spread the love

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार नाशिक दौऱ्यामुळे अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीला अक्षय कुमार दोन दिवस नाशिकजवळ मुक्कामी होता. अक्षय कुमार हेलिकॉप्टरने नाशिकमध्ये आला होता त्यामुळे अक्षय कुमारचा हा दौरा वादात सापडण्याची शक्यता आहे. लॉकडाउनच्या काळात हेलिकॉप्टरला परवानगी व शहर पोलिसांनी दिलेला बंदोबस्त या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत.

अभिनेता अक्षय कुमार याच्या नाशिक दौऱ्याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. हेलिकॉप्टरला उतरण्याची परवानगी, टाळेबंदीत रिसॉर्टमधील वास्तव्य यामध्ये काही गैर घडले असेल तर चौकशी केली जाईल, असे नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी लोकसत्ताला सांगितलं. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता अक्षय कुमार हॅलिकॉप्टरने दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आला होता. त्रंबकेश्वर रोडवरील सपकाळ नॉलेजच्या हेलिपॅडवर त्याचं हेलिकॉप्टर उतरलं होतं. तसेच ग्रेप काउंटी रिसॉर्टमध्ये तो वास्तव्यास होता. अक्षय कुमारला या दौऱ्यासाठी नाशिक शहर पोलिसांकडून सुरक्षा मिळाली होती. नाशिकमध्ये मार्शल आर्ट अॅकेडमी किंवा निसर्गोपचार केंद्र सुरु करण्याच्या उद्देशानं पाहणी करण्यासाठी अक्षय कुमारने नाशइक दौरा केला आहे.

लॉकडाउनमध्ये सर्वजण रस्ते मार्गे प्रवास करत असताना अक्षय कुमार हेलिकॉप्टरने कसा आला? ग्रामिण हद्दीत आला असताना शहर पोलिसांकडून सुरक्षा कशी? रिसॉर्ट बंद असतानाही प्रवेश कसा मिळाला. यासारखे प्रश्न अक्षय कुमारच्या नाशिक दौऱ्यामुळे उपस्थित झाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2020 1:39 pm

Web Title: akshay kumar nashik tour in controversy nck 90Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)