Alia Bhatt welcomes new cat Juniper mppg 94 | आलियाच्या आयुष्यात आली सेल्फी क्वीन मैत्रीण; फोटो होतोय व्हायरल…

0
23
Spread the love

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते. मात्र यावेळी आलिया चक्क एका मांजरीमुळे चर्चेत आहे. होय, आलियाच्या घरी एक सुंदर मांजर आली आहे. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करुन तिने या क्यूट मांजरीची तोंडओळख करुन दिली.

अवश्य पाहा – उर्वशी रौतेलाने गौतम गुलाटीसोबत केलं लग्न?; फोटो पोस्ट करुन म्हणतोय शुभेच्छा द्या

अवश्य पाहा – सुशांतने आत्महत्या केल्यापासून अभिनेत्री पडली आजारी; होऊ लागलाय लो बीपीचा त्रास

आलियाने इन्स्टाग्रामवर या मांजरीसोबतचा एक सेल्फी शेअर केला आहे. “आता आमचं त्रिकूट पूर्ण झालं. आमच्या नवीन बाळाला भेटा. हिचं नाव ज्युनिपर आहे. हिचे विशेष गुण म्हणजे तिला सेल्फी काढायला फार आवडतात.” अशा आशयाची कॉमेंट तिने या फोटोवर केली आहे. आलियाने पोस्ट केलेला हा फोटो सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

यापूर्वी आलिया ऑस्कर पुरस्कारामुळे चर्चेत होती. अ‍ॅकेडमी संस्था दरवर्षी पर्यावेक्षकांच्या समितीमध्ये नव्या सदस्यांची भरती करत असते. यावेळी त्यांनी आपला मोर्चा बॉलिवूडच्या दिशेने वळवला आहे. आलिया भट्टला ऑस्कर पुरस्कार पर्यावेक्षकांच्या समितीमध्ये सामिल होण्याचे आमंत्रण मिळाले आहे. २०२१मध्ये होणाऱ्या या ऑस्कर पुरस्कारासाठी अ‍ॅकेडमी संस्थेने जगभरातील ८१९ नव्या कलाकारांना आमंत्रणं पाठवली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2020 4:45 pm

Web Title: alia bhatt welcomes new cat juniper mppg 94Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)