Ambulance on way to Covid facility turns on its side 12 hurt | पुणे : कोविड सेंटरला जाणाऱ्या अँब्युलन्सचा अपघात, १२ जणं जखमी

0
23
Spread the love

१२ जणांना घेऊन कोविड सेंटरमध्ये जाणाऱ्या अँब्युलन्सचा अपघात झाला आहे. पुणे-बंगळुरु महामार्गावर सोमवारी दुपारी हा अपघात घडला असून यात १२ जणं जखमी झाले आहेत. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यामुळे ही अँब्युलन्स एका दिशेला झुकल्याने हा अपघात झाला. अँब्युलन्समध्ये बसलेल्या व्यक्तींना किरकोळ जखमा झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. कोथरुडमधील जय भवानी नगर आणि किश्कींदा नगर भागातून ही अँब्युलन्स १२ जणांना घेऊन बालेवाडी येथील कोविड सेंटरमध्ये जात होती.

अँब्युलन्समधील लोकं करोनाग्रस्त होती का याबाबत अद्याप नेमकी माहिती समजू शकलेली नाही. हा अपघात झाल्यानंतर स्थानिक लोकांनी अँब्युलन्समधील व्यक्तींना बाहेर काढत त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2020 7:06 pm

Web Title: ambulance on way to covid facility turns on its side 12 hurt psd 91


Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)