Amitabh Bachchan admitted in isolation unit he will keep updating via Twitter says Nanavati Hospital Statement | “अमिताभ स्वत: ट्विटरवरुन उपचारांसंदर्भात चाहत्यांना कळवतील”; नानावटी रुग्णालयाची माहिती

0
24
Spread the love

महानायक अमिताभ बच्चन यांच्यासंदर्भात नानावटी रुग्णालयाने अमिताभ यांच्या प्रकृतीसंदर्भातील माहिती दिली आहे. रुग्णालयाने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार अमिताभ बच्चन यांच्यामध्ये करोनाचा हलकी लक्षणं दिसत असून त्यांना रुग्णालयातील आयसोलेशन युनिटमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे अमिताभ स्वत: ट्विवटवरुन आपल्या आरोग्यासंदर्भात माहिती देत राहतील असं त्यांनी सांगितल्याचे रुग्णालाने स्पष्ट केलं आहे. सीएनबीसीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. अमिताभ मुलगा अभिषेक बच्चन यांना दोघांनाही करोनाची लागण झाल्याचे शनिवारी रात्री उशीरा स्पष्ट झालं. दोघांनाही आपआपल्या ट्विटर हॅण्डलवरुन यासंदर्भातील माहिती दिली.

अमिताभ यांनी गेल्या काही दिवसात त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना करोनाची चाचणी करण्याचं आवाहन केलं आहे. कुटुंबीय आणि कर्मचाऱ्यांची करोना चाचणी करण्यात आली असल्याचं अमिताभ यांनी सांगितलं आहे. अमिताभ यांनी स्वत:च त्यांच्या आरोग्यासंदर्भात चाहत्यांना माहिती देण्याचा निर्णय घेतल्याने त्यासंदर्भात रुग्णालयाने माहिती जारी केली नसल्याचे रुग्णालयातील एका डॉक्टरने स्पष्ट केलं आहे.

पाहा फोटो >> BMC च्या कर्मचाऱ्यांनी हाती घेतलं ‘जलसा’च्या सॅनिटायझेशनचं काम

शनिवारी रात्री बच्चन यांच्या एका डॉक्टरने इंडिया टुडेशी बोलताना गेल्या काही दिवसांपासून त्यांना श्वसनाचा त्रास होत होता अशी माहिती दिली. त्यामुळे अमिताभ यांची  करोना चाचणी केली. शनिवारी संध्याकाळी या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. त्यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना नानावटी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. अमिताभ यांना सध्या व्हेंटिलेटरवर ठेवणार नसल्याची माहिती या डॉक्टरांनी दिली आहे.

डॉक्टरांना अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीसंबंधी काही चिंता करण्यासारखं आहे का? असं विचारण्यात आलं असता त्यांनी हे पूर्णपणे अमिताभ यांचं वय आणि आधी झालेली जखम यावरच अवलंबून असल्याचं म्हटलं आहे. १९८२ साली अमिताभ ‘कुली’ चित्रपटाच्या सेटवर जखमी झाले होते. पण त्यातून बरे  झाल्यानंतर ते आपल्या आरोग्यासंदर्भात अधिक काळजी घेताना दिसत आहेत. त्या अपघातानंतर अमिताभ यांना इतक्या वर्षांमध्ये कोणताही त्रास जाणवलेला नाही. डॉक्टरांनी अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होईल असंही सांगितलं आहे.

अमिताभ यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी म्हणून आम्ही प्रार्थना करत असून ते लवकर बरे होतील अशा आशयाचे हजारो ट्विटस सर्व सामान्य चाहत्यांंपासून ते नेते मंडळी, कलाकार, क्रिकेटपटूंनीही केले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2020 8:38 am

Web Title: amitabh bachchan admitted in isolation unit he will keep updating via twitter says nanavati hospital statement scsg 91Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)