Amitabh Bachchan tests Coronavirus-positive Nanavati Hospital sgy 87 | अमिताभ बच्चन यांना सध्या व्हेंटिलेटरवर ठेवणार नाही, डॉक्टरांनी दिली माहिती

0
20
Spread the love

बॉलिवूड शेहनशहा अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना करोनाची लागण झाली आहे. अमिताभ बच्चन यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अमिताभ बच्चन यांनी स्वत: ट्विट करत आपल्या करोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली. यासोबत त्यांनी गेल्या काही दिवसात आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांना करोनाची चाचणी करण्याचं आवाहन केलं आहे.

दरम्यान अमिताभ बच्चन यांच्या एका डॉक्टरने इंडिया टुडेशी बोलताना अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीची माहिती दिली आहे. अमिताभ बच्चन यांना गेल्या काही दिवसांपासून श्वसनाचा त्रास होत होता असं त्यांनी सांगितलं आहे. करोना चाचणी केली असताना शनिवारी संध्याकाळी त्यांचा रिपोर्ट आला. यावेळी त्यांना करोनाची लागण झाली असल्याचं स्पष्ट झालं. अमिताभ बच्चन यांनी स्वत: आपल्या चाहत्यांना यासंबंधी माहिती देण्याचा निर्णय घेतल्याने रुग्णालयाकडून कोणताही माहिती देण्यात आली नाही असंही त्यांनी सांगितलं आहे. अमिताभ बच्चन यांना व्हेंटिलेटरवर ठेवणार नसल्याची अशी माहिती डॉक्टरांना दिली आहे.

डॉक्टरांना अमिताभ बच्चन यांच्या प्रकतीसंबंधी काही चिंता करण्यासारखं आहे का असं विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, त्यांचं वय आणि आधी झालेली जखम यावर ते अवलंबून आहे. अमिताभ बच्चन यांना १९८२ साला कुली चित्रपटाच्या सेटवर जखम झाली होती. पण त्यातून बरे  झाल्यानंतर ते अतिशय शिस्तबद्धपणे जगत असून कोणताही त्रास जाणवलेला नाही. डॉक्टरांनी अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होईल असंही सांगितलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2020 12:13 am

Web Title: amitabh bachchan tests coronavirus positive nanavati hospital sgy 87Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)