amitabh bachchan tests positive for covid 19 kedar shinde pray for his quick recovery ssj 93 | ‘डॉन को पकडना मुश्कील ही नहीं, नामुमकिन है’; बिग बींसाठी केदार शिंदेच्या प्रार्थना

0
49
Spread the love

अभिनेता अमिताभ बच्चन यांना करोनाची लागण झाली आहे. सध्या त्यांच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बिग बींनी स्वत: ट्विट करत त्यांना करोना झाल्याची माहिती दिली. बिग बींना करोनाची लागण झाल्याचं समजल्यानंतर अनेकांनी ते बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केली आहे. अगदी बॉलिवूडपासून ते मराठी कलाविश्वापर्यंत अनेक सेलिब्रिटींपर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यासाठी प्रार्थना केली आहे. यात मराठी चित्रपट

दिग्दर्शक, लेखक केदार शिंदेनेदेखील बिग बींसाठी प्रार्थना केली आहे. विशेष म्हणजे त्याने खास शब्दांमध्ये लवकर बरे व्हा असं म्हटलं आहे.
बिग बींना करोनाची लागण झाल्याचं समजताच केदार शिंदेने फेसबुकवर पोस्ट शेअर करत ‘डॉन को पकडना मुश्कील ही नहीं, नामुमकिन है’, असं म्हटलं आहे.


“लवकर बरे व्हा, तुम्ही लवकर बरे होण्यासाठी अनेकांनी देवाकडे प्रार्थना करण्यास सुरुवातही केली आहे. डॉन को पकडना मुश्कील ही नहीं, नामुमकिन है”, अशी पोस्ट केदार शिंदेने केली आहे.

काय म्हटलं आहे अमिताभ बच्चन यांनी?

माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे मी रुग्णालयात दाखल झालो आहे. काही चाचण्या आणखीही केल्या जाणार आहेत. मागील दहा दिवसात जे माझ्या संपर्कात आले होते त्यांनीही चाचणी करावी असं आवाहन मी करतो आहे. या आशयाचं ट्विट अमिताभ बच्चन यांनी केलं आहे.

राजेश टोपे यांनी काय म्हटलं आहे?

अमिताभ बच्चन यांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहेत. मात्र त्यांना करोनाची लक्षणं नाहीत.  त्यांची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2020 9:26 am

Web Title: amitabh bachchan tests positive for covid 19 kedar shinde pray for his quick recovery ssj 93Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)